पोट आणि आनंद..
मला जीवनातल्या अनेक गोष्टींविषयी कुतूहल आहे..त्या कुतूहलातून माझ्यासमोर नेहमी नवनविन प्रश्न उगाचंच निर्माण होत असतात..वयाच्या पन्नाशीतही मला वेड्यासारखं या प्रश्नांच्या मागे त्यांच्या उत्तरांच्या शोधात जावसं वातं आणि एखाद्या प्रश्नाची मनासारखी उकल झाली की मला लहान मुलासारखा आनंद होतो..त्याक्षणी मी जगाचा सम्राट असल्याचा आनंद उपभोगत असतो..काही वेळाने वास्तव जगात परतावं लागतं आणि आपल्याला पोटही असल्याचा जुनाच शोध नव्याने लागतो..
पोटापाण्याच्या रुक्ष शोधाच्या मागे जाताना पुन्हा दुसरा प्रश्न समोर उभा राहातो आणि प्रचंड आनंद होऊन क्षणात पोटाची जाणिव नाहीशी होते आणि मग मन नव्याने निर्माण झालेल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात गुतूंन जातं..
ज्या कामाचे पैसे मिळत नाहीत तेच काम करण्यात मला आनंद वाटतो पण कोणी जर तेच काम पैशासाठी कर असं सांगीतलं तर, मनाच्या मर्जीने काम करत असताणा मिळणारा आनंद आणि जाणवणारा उत्साह अचानक अंतर्धान का पावतो हेच मला कळत नाही..
पोटा-पाण्याची व्यवस्था आणि आनंद एकाच कामातून मिळणारे किती नशिबवान असतात नाही..!!
पहाटे उठून मोकळ्या हवेत तास-दोन तास फिरायला किती छान वाटतं नाही? परंतू तोच सल्ला डाॅक्टरने प्रकृतीच्या कारणासाठी दिला तर, तेच फिरण अचानक जाचक वाटू लागतं तसंच तर नसावे हे?
-गणेश साळुंखे
Leave a Reply