मनोहर श्याम जोशी हे हिंदी भाषेचे प्रख्यात पत्रकार, लेखक आणि पटकथाकार!
मनोहर श्याम जोशी यांना ‘भारतीय दूरदर्शनच्या सोप ओपेराचे जनक’ म्हटलं जातं कारण ‘हम लोग’ आणि ‘बुनियाद’ या दूरदर्शनवरच्या पहिल्या महामालिका त्यांच्याच सिद्धहस्त लेखणीतून उतरल्या होत्या. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १९३३ रोजी अजमेर येथे झाला.
भारतीय समाजाचं प्रतिबिंब असणाऱ्या त्या मालिकांनी दर्शकांना अनेक वर्षं बांधून ठेवलं होतं. याशिवाय त्यांनी लिहिलेल्या ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’,‘काकाजी कहीन’,‘हमराही’,‘जमीन आसमान’,‘गाथा’यांसारख्या मालिकाही लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांची ‘कसप’ ही कादंबरी तर हिंदी भाषेतल्या सर्वोत्तम प्रेमकथांमध्ये अग्रेसर मानली जाते. मनोहर श्याम जोशी यांच्या ‘क्याप’ कादंबरी करता २००५ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यांनी हे राम, अप्पू राजा, पापा कहते है आणि भ्रष्टाचार यांसारख्या सिनेमांसाठी पटकथा-संवादही लिहिले आहेत.
मनोहर श्याम जोशी यांचे ३० मार्च २००६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply