महाराष्ट्र हे संस्कृती व्रतवैकल्ये जपणारे राज्य. महाराष्ट्राला छ.शिवाजी महाराज, छ.शाहु महाराज, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर असा अनेक थोरामोठ्यांचा वारसा लाभला आहे… अनेक वर्षांपासुन दिमाखात उभे असलेले गडकिल्ले, आषाढ-कार्तीक महिन्यात शेकडो मैल पायी अंतर पायी कापणार्या दिंड्या याची साक्ष देत आहेत.
महाराष्ट्र जीवनशैलीच्या नसानसांमध्ये संस्कृतीचे दर्शन घडते… पुर्वी मनोरंजनाचे साधने हि व्यक्तिअखत्यारीत सहभागातुन प्रत्यक्ष स्वरूपात असत.. क्रिडा-संगीत-कसरत-संस्कृती याची एकत्रित सांगड असलेले करमणुकीचे कार्यक्रम पुर्वी गावागावात होत असत.. धार्मिक कार्यक्रमातील किर्तण-प्रवचनामधुन धर्मकारणासोबतच समाजप्रबोधन केले जात असत.. तसेच भारूडाच्या माध्यमातुन समाजातील अनिष्ट प्रथेवर मार्मिक टिका-टिप्पनी केली जात असे.. गावागावांमध्ये भरणा-या जत्रा-उत्सवांदरम्यान लोकनाट्य.. सोंगे यांची रेलचेल असायची.. नाथपंथी.. डवरी.. मरीआईवाले.. कुडमुड्या जोशी.. कोल्हाटि.. वासुदेव.. पिंगळे…….. पोतराज अशा जमातीमधील लोक ग्रामिण तसेच निमशहरी भागातील लोकांची करमणुक करीत असत.. हे समाजबांधव धार्मिक, पुराणकाळातील अनेक व्यक्तिरेखा साकारत.. गावागावात आपली कला सादर करून व भिक्षा मागुन ते आपली गुजरान करत असत..
पुर्वी गावात एखादा बहुरूपी आला की लहान मुलांपासुन – मोठ्या माणसांपर्यंत उत्सुकता असायची.. पोलिस गणवेशात आलेला एखादा बहुरूपी पाहुन ग्रामिण महिलांची घाबरगुंडि उडायची.. त्यानंतर जेव्हा कळायचे कि हा रायरन म्हणजेच बहुरूपी आहे तेंव्हा मात्र सर्वांच्या जीवात जीव यायचा.. त्या बहुरूपी बांधवांच्या अभिनयाने – संवादाने ते ओळखु येत नसत.. ज्यावेळी खुलासा होत असे त्यावेळी मात्र सर्वत्र हशा पिकुन या बांधवांच्या अभिनय कौशल्याचे कौतुक होऊन त्यांना भरभरून दान दिले जात होते.. अशाच प्रकारे पोतराज.. मरीआईवाले.. गोसावी.. वासुदेव.. पिंगळे.. कोणिहि रीकाम्या झोळीने जात नसत.. भिक्षा मागणारे हे बांधवहि लोकांना भरभरून आशिर्वाद देत असत….
———————••
”चला काकु~चला काकु लग्नाला चला..
चला काकु~चला काकु लग्नाला चला.. पोरं बांधा खांबाला अनं कुत्री घ्या काकाला.. ढेकणाची उसळ ~ शेंबडाची कढि.. चला काकु चला काकु लग्नाला चला……
अशाप्रकारे मार्मिक शब्दफेक करून जनमाणसाच्या चेह-यावर हसु उमटवणारे व आपल्या संस्कृतीचा भाग असणारे हे समाजबांधव पिढ्यानपिढ्या गावोगावी फिरून महाराष्ट्र संस्कृतीचे जतन करतात…. मात्र एका घटनेने सारा देश हादरून गेला.. सोशल मिडियावरच्या एका खोडसाळ मॅसेज मुळे या समाजातील जवळपास सहा बळी गेले… काहिहि चुक नसताना या समाजबांधवांना ठेचुन-ठेचुन मारण्यात आले.. सोशल मिडियावरची एक अफवा काय करू शकते याचा प्रत्यय देशवासियांना आला..
”मुलं चोरणारी टोळी” समजुन या भिक्षेकरी नाथपंथी समाजातील समाजबांधवांना जीव जाईपर्यंत मारण्यात आले.. या बांधवांना मारत असताना गावातील एकाहि सज्जन माणसाला त्यांची दया आली नाहि हि सर्वात मोठी शोकांतिका आहे.. कोणतीहि विचारपुस-चौकशी न करता केवळ संशयावरून मृत्युदंड देणे तेहि तब्बल पाच जणांना..! त्या लोकांना मारहान करत असतानाचा एक व्हिडिओ पाहिला असता ते पिडित लोक ओरडुन ओरडुन सांगत होते.. हात जोडत होते… मात्र मारहान करीत असलेले लोक काहिच ऐकुन घेण्याच्या मनस्थितीत नव्हते… एक हजार ते बाराशेचा लोकसमुह केवळ पाच व्यक्तिंना मार देत होता… मार देणारे लोक व मार देण्याची पध्दत वेळोवेळी बदलत होती.. मात्र मार खाणारे लोक मात्र तेच होते… मार खात असताना त्यांच्या जवळ असणारे लायसन्स – ओळखपत्र.. व मान्यतापत्र ते दाखवित होते मात्र त्यांना मार देणारे काहिहि ऐकुन न घेता या पाच जणांवर कोणती दुष्मणी काढत होते देव जाणे…
धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे आठवडा बाजार दरम्यानची हि घटना.. बाजार चालु होत असतानाच काहि खुशालचेंडुंनी गावात मुल चोरणारी टोळी दाखल झाल्याची अफवा पसरवली आणि होत्याचे नव्हते झाले.. अशाच प्रकारे औरंगाबाद जिल्हातहि दोन जणांना मारहान झाली यातील एकाचा मृत्यु झाला व एकजन गंभीर जखमी झाला.. शेजारच्या तेलंगनामध्ये हि अशाच प्रकारे सोंगे घेणा-या बहुरूपी कलाकाराला मारण्यात आले….
”मुल चोरणा-या टोळीला या गावात पकडले.. सावधान ” असे अफवात्मक मॅसेज सर्वत्र फिरत आहेत.. मात्र कुठला मॅसेज खरा आहे.. मॅसेजमध्ये असलेले एडिटिंग.. व वेगळेपना जाणुन न घेता अशा प्रकारे समाजात दुभंगता निर्माण करून स्वता बाजुला राहणे व त्याचे परीणाम या लोकांनी जीवजाई पर्यंत भोगणे हे कोणत्या संस्कृतीशी निगडित आहे याचा विचार लोकांनी करावा.. ज्या लोकांना स्वताच्या मुलांचे पोट भरण्यासाठी शेकडो मैल जावे लागते ते लोक दुस-याची मुले पळवुन त्यांना काय खाऊ घालणार… आजहि या समाजातील मागासलेपना तपासुन पहा.. हे लोक अजुनहि आपल्या महाराष्ट्र संस्कृतीचे जतन करण्यासाठी अजुनहि भिक्षा मागुनच गुजरान करतात.. काल हत्या झालेल्या व्यक्तिंसाठी मुठभर लोक पुढे आले… या पिडित कुटुंबातील बायका-मुले आज रस्त्यावर आली..
कर्ता पुरूष निघुन गेल्यावर गर्भश्रीमंत कुटुंबाची वाताहात होते.. मग अशा कुटुंबाची काय अवस्था झाली असेल.. काय चुक होती या बांधवांची कि त्यांना ठेचुन मारण्यात आले..या राईनपाडा गावातील मारहान करणारे लोक पिडितांनी जीव सोडला तरी लाथा-बुक्यांनी तो निष्पाप मयत देह तुडवत होते.. तब्बल चार तास हा प्रकार चालला होता.. तरीहि या गावातील विकृतींचे समाधान झाले नाहि… चार तासांच्या या घटनेदरम्यान गावातील माजी सरपंचाने पोलिसांना फोन करून कळविण्याचे औदार्य दाखवले खरे पन पोलिस येईपर्यंत या निष्पाप बांधवांनी जगाचा निरोप घेतला होता.. अख्खा गाव या पाच जनांवर तुटुन पडला होता.. त्यांची काहिहि चुक नसताना.
हा नाथपंथी डवरी गोसावी समाज अतिशय मवाळ आहे.. गावोगावी फिरून भिक्षुकी करून पोटाची खळगी भरणे एवढाच उद्योग त्यांना ठाऊक.. शिक्षणाच्या बाबतीतहि मागास असलेला हा समाज आधुनिकतेच्या मुख्य प्रवाहापासुन बरेच अंतर लांब आहे.. त्यामुळे या समाजाचे एकिकरन तर लांबच परंतु या समाजाचा कधिहि आपल्या मागण्यांसाठी कुठला मोर्चा अथवा समाजास हानी पोहचेल असे कार्य घडत नाहि..
या घटनेत मृत पावलेल्या लोकांना जरी शासनाने १० लाख मदत दिली असली तरी या समाजातील अनेक कुटुंबे भेदरली आहेत.. त्यांना हि शासनाने व समाजबांधवांनी धिर देण्याचे औदार्य दाखवले पाहिजे…!!!
— केतनकुमार अशोकराव इंदुरे
भवानी पेठ करमाळा.
Leave a Reply