सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक यांचा जन्म १७ ऑगस्ट १९६० रोजी झाला.
गिरीश ओक व्यवसायाने खरे डॉक्टर आहेत. त्यांच्या कुटुंबाचा नाटकाशी तसुभरही संंबंध नाही. ते स्वत:ही वयाच्या १७ वर्षांपर्यंत नाटकाच्या संपर्कात आले नव्हते. वैद्यकीय पदवी मिळविल्यानंतर त्यांनी नागपुरात रुग्णालय सुरू केले होते. यानंतर त्यांना वाटायला लागले की, हे आपले काम नाही. आपल्याला काहीतरी वेगळे करायचे आहे. यामुळे ते अभिनय करायला मुंबईत गेले. अथक परिश्रम घेऊन उत्कृष्ट नाट्य व चित्रपट अभिनेते म्हणून लौकिक प्राप्त केला.
प्रभाकर पणशीकरांनी ‘तो मी नव्हेच’ हे नाटक एका उंचीवर नेऊन ठेवले होते. डॉ. गिरीश ओक या नाटकाबद्दल म्हणतात, “तो मी नव्हेच, हे नाटक अजरामर करण्यात स्व. प्रभाकर पणशीकरांचा सिंहाचा वाटा आहे. तेव्हा लखोबा लोखंडेची भूमिका करताना माझ्यावर बराच ताण आला होता. लखोबा लोखंडेच्या भूमिकेला न्याय देणे मला शक्य होईल का, याबाबतही थोडी धास्ती होती. सुरवातीच्या प्रयोगानंतर माझ्या भूमिकेची तुलना पणशीकरांच्या भूमिकेशी करायचे. परंतु कालांतराने तुलना करण्याचे प्रमाण कमी झाले. “तो मी नव्हेच’ या नाटकाचे “शिवधनुष्य’ मला पेलवेल का, अशीही विचारणा झाली. परंतु केवळ “शिवधनुष्य’ उचलले नाही तर “शिवधनुष्या’चे “इंद्रधनुष्य’ केले, अशा प्रतिक्रिया रसिकांनी माझ्याकडे व्यक्त केलेल्या आहेत.
याव्यतिरिक्त आणखी काय हवे. हे नाटक गिरीश ओक यांच्या आयुष्यात मैलाचा दगड ठरले आहे. तसेच ती फुलराणी मधील त्यांचे संस्मरणीय आहे. गिरिजा ओक या डॉ.गिरीश ओक यांच्या कन्या आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply