मराठी अभिनेता, गीतकार, दूरचित्रवाणी माध्यमातील सूत्रसंचालक जितेंद्र जोशी यांचा जन्म २७ जानेवारीला पुणे येथे झाला.
मराठी चित्रपट सृष्टीत जितू या नावाने प्रसिद्ध असलेला जितेंद्र जोशी हा उत्तम अभिनेता, कवी, सूत्रसंचालक अशा वेगवेगळ्या स्वरूपात तो रसिकांसमोर आला आणि प्रत्येक भूमिकेत तेवढाच लोकप्रिय झाला. आज नाटकं, मालिका आणि सिनेमांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्यांमध्ये जितेंद्र जोशी हे नाव आग्रहानं घेतलं जातं.
जितेंद्र जोशी हा पुण्याचा त्याचे बालपण व शिक्षण पुण्यात झाले. जितेंद्र जोशी पुण्याच्या राजा धनराज गिरजी हायस्कूल व सेंट जॉन सेकंडरी स्कूलचा विद्यार्थी. जितेंद्र जोशीने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात सतीश राजवाडे यांच्यासोबत त्यांचा सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. नकळत सारे घडले, हम तो तेरे आशिक हैं मधल्या त्याच्या अभिनयाचं समीक्षकांनी प्रचंड कौतुक केलं आहे. त्याने मराठीवरच्या हास्यसम्राट या मालिकेचं सूत्रसंचालन केले आहे. त्याच्या विनोदी स्वभावाचं दर्शन या कार्यक्रमातूनही घडलं. “नकळत सारे घडले” असे एक नाटक नातू आणि आजोबा यांच्या वैचारिक संघर्षाबद्दल मराठी रंगभूमी वर आले होते.
सुरवातीला त्यामध्ये विक्रम गोखले यांचे बरोबर जितेंद्र जोशी काम करीत असे. इतके जबरदस्त नाटक होते कि त्यामध्ये नातू आणि आजोबा यांच्या संघर्षामध्ये सध्याच्या दोन पिढ्यातील अंतर इतक्या प्रभावीपणे मांडला आहे कि हे नाटक पाहताना डोळ्यात अक्षरश अश्रू येतात. यात विक्रम गोखले यांचे बरोबर जितेंद्र जोशी यानेही सुंदर काम केले होते.
जितेंद्र जोशी याने कविता ही सुंदर केल्या आहेत. अख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेलं “कोंबडी पळाली” हे गाणं लिहीणारे गीतकार जितेंद्र जोशीच आहे. जितेंद्र जोशी अभिनयासह सोशल मीडियावरही बराच सक्रीय असतो. या माध्यमातून तो आपले मित्र आणि चाहत्यांसोबत संवाद साधतो. तसेच आमिर खानच्या पाणी फाऊंडेशनसाठी जितेंद्र जोशी काम करत आहे.
जितेंद्र जोशीच्या पत्नीचे नाव मिताली जोशी असून ती गृहिणी आहे. मिताली चित्रपट व नाटकांचे लेखन करते आणि तिने नाटकांचे दिग्दर्शनही केले आहे. नेटफिलक्सच्या सेक्रेड गेम्स या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये काटेकरची भूमिका जितेंद्र जोशीने साकारली होती. या भूमिकेतून त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.
सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘दोन स्पेशल’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र जोशी करत आहे. तसेच ३१ जानेवारी २०२० ला ‘जितेंद्र जोशीचा चोरीचा मामला’हा मराठी चित्रपट प्रदर्शित होता आहे,सध्या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. मल्टीस्टारकास्ट असलेल्या या चित्रपटात जितेंद्र जोशी एका अतरंगी भूमिकेत दिसणार आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply