मराठी अभिनेता दिग्दर्शक लोकेश गुप्ते यांचा जन्म ३ मार्च १९७५ रोजी झाला.
लोकेश गुप्ते हे नाव छोट्या पडद्यावर तसेच चित्रपट नाटकांतून अभिनेता व दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या परिचयाचे आहे. लोकेश गुप्ते ह्यांच्या अभिनयाची सुरूवात विनय आपटे ह्यांच्या अभिनेत्री नाटकांना झाली. नथुराम गोडसे या नाटकामध्ये ही ते होते. त्यांचा पहिला चित्रपट त्यांनी विनय आपटे ह्यांना समर्पित केला होता.
‘वादळवाट’मालिकेतील समर अजिंक्य या पात्राने त्यांना अभिनेता म्हणून नवी ओळख दिली. वादळवाट मालिका त्यांच्या आयुष्यातलं महत्वाचं वळण ठरलं. कारण मध्यंतरीचा काही काळ ते पूर्णत: एडिटींग क्षेत्रामध्ये होते. मात्र, ज्यावेळी लोकेश गुप्ते यांनी पुन्हा अभिनय क्षेत्रात यायचं ठरवलं त्यावेळी वादळवाटने त्यांना नवा चेहरा दिला. जुळून येती रेशीमगाठी आणि खुलता कळी खुलेना या मालिकांमध्ये त्यांनी मालिकेत त्यांनी अभिनेता ललित प्रभाकरच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली होती.
गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारीत हिंदीतील ‘क्राईम पेट्रोल- दस्तक’या मालिकेत लोकेश गुप्ते यांनी काम केले आहे. वादळवाट, बेधुंद मनाची लहर, जुळून येती रेशीम गाठी आणि खुलता खळी खुलेना अशा अनेक मालिकांमधून घराघरांत पोहचलेला लोकेश गुप्ते यांनी ‘एक सांगायचंय…. Unsaid Harmony’ या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं.
लोकेश गुप्ते यांनी ‘एक सांगायचंय..’ चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच त्यांनी त्याचं लेखन आणि संकलन अर्थात एडिटिंगसुद्धा केलं होते. त्यामुळे त्यांनी लेखक, एडिटर आणि दिग्दर्शक अशा तीन भूमिका बजावल्या होत्या. तर त्यांची पत्नी चैत्राली गुप्तेनं चित्रपटाच्या वेशभूषेची जबाबदारी सांभाळली होती. याच चित्रपटातून त्यांची कन्या शुभवी गुप्ते चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. पुढे त्यांनी ‘ऋणानुबंध’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. ‘लोकेश गुप्ते’ पत्नी चैत्राली चिरमुले या अभिनेत्री असून त्या अभिनेत्री भार्गवी चिरमुलेची धाकटी बहीण आहे. लोकेश आणि चैत्राली यांनी लग्नाची बेडी या नाटकात एकत्र काम केले होते व पुढे लोकेश आणि चैत्राली गुप्ते ख-या आयुष्यात ‘लग्नाच्या बेडीत’अडकले. चैताली यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. सत्ताधीश या नाटकामुळे त्या नावारूपाला आल्या. सध्या त्या अभिनयाबरोबर वेशभूषेचे काम करत आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply