मराठवाडी बोलीच्या ढंगातील संवादफेकीसाठी व विनोदी अभिनयासाठी ते प्रसिद्ध आहेत. मकरंद अनासपुरे यांचा जन्म २२ जून १९७३ रोजी औरंगाबाद येथे झाला.
मकरंद अनासपुरे यांनी ”सरकारनामा” या चित्रपटातुन आपली मराठी चित्रपट सृष्टीतील कारकीर्द सुरु केली. २००५ मध्ये आलेल्या चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ”कायद्याच बोला” या चित्रपटाच्या यशाने त्यांना मराठी चित्रपटांमध्ये एक नवीन ओळख मिळाली. त्या नंतर अनेक विनोदी चित्रपटात त्यांनी अभिनय केला. पण विनोदी अभिनेता असा ठसा पुसण्यासाठी त्यांनी ”सुम्भराण”, ”पारध”, ”अनवट” अशा चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी ”डँबीस” या चित्रपटाचे दिग्दर्शन हि केले आहे. सोबतच त्यांनी ”गोष्ट छोटी डोंगराएवढी” आणि ”गल्लीत गोंधळ” दिल्लीत मुजरा या चित्रपटांची निर्मिती केली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना आधार देण्यासाठी पुढे आलेल्या अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचे कार्य कौतूकास्पद ठरत आहे. कारण त्यांनी सुरू केलेल्या नाम फाऊंडेशनला राज्यातील जनतेने भरभरून प्रतिसाद दिला आहे. या संस्थे अंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकर्यांना मदत करतात.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply