अमृता सुभाष कुलकर्णी म्हणजेच अमृता सुभाष ही चित्रपट, मालिका आणि नाटक या माध्यमात काम करणारी अभिनेत्री आहे, यासोबतच लेखिका, गायिका आणि संगीतकार म्हणून देखील तिने काम केले आहे. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती सुभाष यांची ही लेक. त्यांचा जन्म १३ मे १९७९ रोजी झाला. एक प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून अमृता सुभाषची ओळख आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची विद्यार्थीनी असलेल्या अमृताने एनएसडीमध्ये असतानाच अनेक मराठी, हिंदी, जर्मन नाटकांमध्ये काम केले. अमृताला तशी अभिनयाचे आणि संगीताचे बाळकडू तिच्या आईकडून मिळाले. अनेक नाटकांमधील बहारदर भूमिकांमूळे अमृताची एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्यात तिला तिच्या ‘ती फुलराणी’ या नाटकातील भूमिकेने अधिक प्रसिद्धी दिली. या नाटकानंतर तिची खरी ओळख निर्माण झाली. ‘श्वास’ या सिनेमाद्वारे अमृताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिने ऑस्कर पुरस्कार नामांकीत ‘श्वास’ या चित्रपटातील भूमिकेने एक वेगळाच ठसा उमटवला. आणि आज ती पठडीबाहेरच्या चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये भूमिका करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नाटक आणि चित्रपटांबरोरच अमृताला प्रसिद्धी मिळाली ती झी मराठी वाहिनीवरील ‘अवघाची संसार’ या मालिकेतील भूमिकेने…या मालिकेतील भूमिकेने आज तिला घराघरात ऒळखल्या जाते. या मालिके व्यतिरीक्त अमृताने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये दर्जेदार भूमिका केल्या आहेत. अमृता सुभाष उत्तम अभिनेत्री असून ती एक गायिका आणि लेखिकादेखील आहे. तीन वर्षे तिने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. ‘जाता जाता पावसाने’ हा तिचा अल्बम प्रकाशित झाला आहे. याशिवाय ‘हापूस’ ‘अजिंठा’ या सिनेमांसाठी अमृताने पार्श्वगायन केले आहे.
अमृता सुभाष एक संगीतकार सुद्धा आहे. ‘निताल’ आणि ‘तीन बहने’ साठी तिने संगीत दिले आहे. शिवाय ‘सारेगमप’ या मराठी सांगितिक कार्यक्रमात ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या कार्यक्रमात टॉप ५ पर्यंत तिने मजल मारली होती. स्मिता पाटील यांच्यानंतर कानवारी करणारी अमृता पहिली मराठी अभिनेत्री ठरली. सॅडर्टे संडे’ या सिनेमात अमृताचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला होता. या सिनेमात मुख्य भूमिका साकारणारे नचिकेत जोशी आणि मकरंद देशपांडे यांच्यासोबत अमृताने किसींग सीन दिले होते. अमृताने मराठी चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही काम केले आहे. ‘रमन राघव 2.0’ या सिनेमात अमृता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत झळकली होती. ‘पुनश्च हनीमून’ हे तिचे नाटक अतिशय लोकप्रिय झालं. या नाटकाची महत्वाची गोष्ट म्हणजे या नाट्काचं लेखन, दिग्दर्शन तिचा पती संदेश कुलकर्णीने केलं असून यात त्याने मुख्य अभिनेत्याची भूमिका सुद्ध केली आहे. याआधीही या दोघांनी अनेक नाटकांमध्ये एकत्र काम केले आहे. अमृताला ‘किल्ला’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अमृताचे लग्न प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा भाऊ संदेश कुलकर्णी सोबत झाले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply