दिपाली सय्यद म्हणजेच दिपाली भोसले लग्ना नंतर ती दिपाली सय्यद झाली. तिचा जन्म १ एप्रिल १९७८ रोजी पाटणा, बिहार येथे झाला. सुरवातीपासुनच एक अभिनेत्री होण्याचे तिचे स्वप्न होते. दिपाली सय्यदचे बालपण मुंबईत गेले. दिपालीने नालंदा विद्यापीठातुन फाईन आर्ट्सची पदवी संपादन केलेली आहे. अभिनय क्षेत्रातील तिचा प्रवास मालिकांमधुन सुरु झाला. बंदीनी, समांतर या तिच्या अभिनय कारकिर्दीतील सुरवातीच्या मालिका. त्यानंतर अनेक चित्रपट, मालिका, शोज, नाटक, टिव्ही शोज, जाहिराती यातुन ती सातत्याने झळकत राहिली.
दिपाली जाऊ तिथे खाऊ, चश्मेबहाद्दर, लग्नाची वरात लंडनच्या दारात या चित्रपटांमधील तिच्या भुमिकांसाठी विशेष करुन ओळखली जाते. मात्र तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता जत्रा चित्रपटातील ये गो ये मैना.. या गाण्यातून मिळाली. करायला गेलो एक, लाडी गोडी, होऊन जाऊ दे, मला एक चानस हवा, ढोलकीच्या तालावर, वेलकम टु जंगल, हे मिलन सौभाग्याचे, माझ्या नवर्याची बायको, उचला रे उचला, काय करु न कसं करु, दुर्गा म्हंत्यात मला, काळशेकर आहेत का ?, मास्तर एके मास्तर, मुंबईचा डबेवाला, सासु नंबरी जावई दस नंबरी हे तिचे तिने अभिनय केलेले इतर चित्रपट. तर दुर्वा, अफलातुन या हिंदी मालिकांमधुनही ती चमकली आहे. याशिवाय तिने आतापर्यंत पाच सहा भोजपुरी चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत.
३१ मे २००८ रोजी दिपाली दिग्दर्शक बॉबी खान यांचेबरोबर विवाहबध्द झाली असुन लग्नानंतरचे तिचे नांव सोफीया जहांगीर सय्यद असे आहे. दिपालीने अहमदनगर मतदार संघातुन सन २०१४ मध्ये निवडणुक लढवलेली होती. दिपाली सय्यदने नगर जिल्ह्यातील “गुंडेगाव ” या ठिकाणी ‘दिपाली सय्यद-भोसले फाऊंडेशन’च्या माध्यमातून वृद्ध आणि अनाथ मुलांसाठी आश्रम उभारले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply