नवीन लेखन...

प्रख्यात मराठी लेखिका मीना देशपांडे

मीना देशपांडे यांचा जन्म १४ मार्च १९३४ रोजी झाला.  ६ सप्टेंबर २०२० रोजी निधन झाले. अॅड बाबुराव कानडे यांनी वाहिलेली श्रद्धांजली.

साहित्य सागरातील कोहिनूर हिरा साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या दोन एक हिरकण्या कवयित्री शिरीष पै व दुसरी हिरकणी मीना देशपांडे.

मीनाताई देशपांडे छोट्या कन्या होत्या आणि आचार्य अत्रे यांच्या जवळ ज्येष्ठ कन्या शिरीष पै असल्यामुळे त्यांचा सहाजीकच गाजावाजा खूप झाला. परंतु कनिष्ठ कन्या असल्यामुळे प्रसिद्धीच्या झगमगाटापासून त्या दूर राहिल्या. मीनाताई आपल्या मातोश्री सुधाताई अत्रे आणि मीनाताई तसे पाहिले तर एकूणच प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर होत्या. त्याचा अर्थ असा नाही की त्यांनी साहित्य निर्मिती केली नाही ही असा होत नाही. सुधाताई अत्रे यांनी आपले आत्मचरित्र ” गोदा तरंग “हे लिहिलेले होते आणि त्याचे शीर्षक देखील आचार्य अत्रे यांनी सांगितलेले होते. सुधाताईच्या बराचसा काळ नाशिक मध्ये गेल्यामुळे त्यांनी आपल्या आत्मचरित्राला गोदा तरंग हे नाव दिले होते . मीनाताई यांचे धुळ्याचे माननीय प्राध्यापक सुधाकर देशपांडे यांच्याशी विवाह झाला त्या विवाहाला सोपानदेव चौधरी यांनी मंगलाष्टके गायलेली होती.

माननीय सुधाकर देशपांडे यांना आपल्या सासऱ्यांच्या प्रसिद्धीच्या वलयात मध्ये हे राहायचे नव्हते त्यांना त्यांची स्वतःची ओळख निर्माण करायची होती. म्हणूनच त्यांनी नॅशनल कॉलेजमध्ये हे प्राध्यापकाची जागा भूषविलेली होती. मीनाताई यांचे हळूहळू साहित्याच्या संदर्भामध्ये कार्य चालूच होते. माननीय मीनाताईंना पहिली मुलगी झाली. त्यावेळेला आचार्य अत्र्यांनी दैनिक मराठांमध्ये आचार्य अत्रे आजोबा झाले ही आठ कलमी बातमी दिली होती. त्यांची ती नात लवकरच देवाघरी गेली आचार्य अत्रे मीना लाई बददल फारच हळवे होते.

एकदा शिवशक्ती च्या गच्चीवर आचार्य अत्रे सुधाकरराव यांना म्हणाले हा शेजारचा डोंगर दिसत आहे तो आपलाच आहे. त्या ठिकाणी मी आता स्टार ऑफ इंडिया नावाचे इंग्रजीत दैनिक सुरु करणार आहे. स्टार ऑफ इंडिया म्हणजे महाराष्ट्र हा “स्टार “होय. महाराष्ट्र आचार्य अत्रे यांचा प्राण होता. आणि त्याचे संपादन तुम्ही करावे अशी माझी इच्छा आहे असे आचार्य अत्रे सुधाकररावांना म्हणाले.

माननीय मीनाताई देशपांडे यांनी नाते अश्रूंचे ” ही आपल्या वडिलांच्या विषयी एक फार मोठी विलापिका लिहिलेली आहे. जसे अज” राजाने त्यांची पत्नी इंदुमती गेल्यानंतर विलापिका लिहली. त्याप्रमाणे आचार्य अत्रे यांच्या निधनानंतर नाते अश्रुशी ही फार मोठी हृदयद्रावक विलापिका मीनाताईनी लिहिली. त्याच प्रमाणे आचार्य अत्रे एक महाकाव्य हेही आपल्या वडिलांच्या वर लिहिलेले अतिशय संस्मरणीय असे पुस्तक होय मीनाताई देशपांडे या चौफेर साहित्यिक होत्या. त्यांनी कादंबरी लिहिलेली आहे. जगात नावाजलेली सौंदर्य समाजी मार्लिन मनो यांच्या जीवनावर त्यांनी कादंबरी लिहिलेली आहे. त्याप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या महासंग्रामावर हुतात्मा “नव्याची मोठी कादंबरी त्यांनी लिहिली आहे. सगळ्यात महत्त्वाचे मोठे कार्य मीनाताईचे म्हणजे आचार्य अत्रे यांचे उर्वरित चरित्र कर्हेचे पाणी त्यांनी पूर्ण केलेले आहे आचार्य अत्रे म्हणत पुढील तीन खंड हे अतिशय स्फोटक असतील परंतु मीनाताईंनी लिहिलेले पुढील तीन खंड स्फोटक नसून वास्तववादी, अलिप्तपणे घेतलेला आढावा होय अशाप्रकारे आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करणारी ही छोटी हिरकणी अतिशय मधुर भाषणी लाघवी होती. आचार्य अत्रे यांचे उरलेले तीन खंड मीनाताईनी पूर्ण करून आपल्या वडिलांची अपुरी इच्छा पूर्ण केलेली आहे. मीनाताई बांटा पश्चिमीला मेकर महाल नावाच्या मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये राहत होत्या.

त्याठिकाणी त्यांची मी अनेक वेळा भेट घेतलेले आहे. सुधाकरराव ज्यावेळेला चांगल्या स्थितीमध्ये होते. त्या वेळेला देखील त्यांनी माझे आचार्य अत्रे यांच्या बद्दलचे कार्याची प्रशंसा केली. नंतरच्या काळामध्ये माननीय प्राध्यापक सुधाकर देशपांडे आजारी पडले आणि त्यांचा सगळे आजारपण मीनाताईनी काढलं. प्राध्यापक सुधाकर देशपांडे गेल्यानंतर त्यांचा आधारच गेल्यासारखं वाटलं त्यांना एक मुलगा हर्षवर्धन देशपांडे हा फिल्म मेकिंग मध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. त्याप्रमाणे सुप्रिया नावाची त्यांची मुलगी अमेरिकेमध्ये असून त्या आपल्या मुलीकडे बारंवार जात होत्या आणि शेवटचा श्वास देखील त्यांनी सुप्रियाच्या घरीच अमेरिकेमध्ये घेतला.. मीनाताई देशपांडे आणि शिरीष शिरीष पै या दोघी संख्या बहिणी. मीनाताईच्या थोरल्या बहिणीवर अतोनात प्रेम होते. नेहमी आपल्या बहिणी बद्दल आदराने त्या बोलत असत. शिरीषताई 2 सप्टेंबर 2017 गेल्या आणि सात सप्टेंबरला 2020 मध्ये मीनाताई देशपांडे देवाघरी जाव्यात हा एक मोठा योगायोगच वाटतो त्याच महिन्यांमध्ये आपल्या बहिणीच्या भेटीला त्या गेल्या असाव्यात असे आपल्याला वाटेल मीना देशपांडे यांनी आपल्या वडिलांची सेवा आईची सेवा मोठ्या ममतेने केली माझ्या आणि मीनाताईच्या वारंवार भेटीगाठी होत असत.

पुण्यातील आचार्य अत्रे यांच्या स्मारकात मीनाताईंनी भेट दिली होती. शिरीष ताईनी सुद्धा भेट दिली होती. मोठा मुलगा ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र पै यांनी देखील एका 13 जूनला माझे आजोबा आचार्य अत्रे यावर आमच्या प्रतिष्ठान मध्ये भाषण केलेले होते. मीनालाई देशपांडे यांच्या निधनाने माझी गुरु- • भगिनी काळाच्या पडद्याआड गेली हे मोठे शल्य माझ्या मनाला लागून राहिलेले आहे. आणि हर्षद सुप्रिया यांची समजूत कशी काढावी? त्यांचं सांत्वन कसं करावं ?. यासंदर्भात माझ्याजवळ शब्द नाहीत. त्याच प्रमाणे ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र पै आणि त्यांचेवर कुटुंबीय यांच्यावर दुसरा आघात झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या मनस्थितीचे देखील कल्पना येते. गेल्या तीन वर्षामध्ये आई आणि मावशी जाव्यात हे सहनशक्तीच्या पलीकडे आहे. मी लिहीत असलेल्या आचार्य अत्रे यांच्या सर्व लेखांना चटकन दात देणाऱ्या मीनाताई कालचा माझा “ऐक्य” मधील डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि आचार्य अत्रे या लेखाला त्यांची दाद आली नाही त्याच वेळेला माझ्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकली. मीनाताई देशपांडे गेल्याने आचार्य अत्रे यांच्या आखोदेख्या आठवणी सांगणाऱ्या आता या साहित्य प्रांतातल्या त्यांच्या मुली नाहीत ही खंत आहे. मीनाताई शांत, संयमी आपले काम बरे आणि आपण बरे अशा स्वभावाच्या होत्या. मला तर माझ्या घरातील थोरली बहीण गेल्यासारखे वाटत आहे. अनेक साहित्य सम्राटांची आपत्ये साहित्य मध्ये कोणतीही कामगिरी न करता राहतात. अशी अनेक उदाहरणे आहेत. परंतु आचार्य अत्रे या साहित्य सम्राटाच्या दोन महान कन्यांनी हिरकण्यांनी मराठी साहित्य प्रांतांमध्ये दैदिप्यमान कामगिरी केली आहे असाच दाखला इतिहासाला दयावा लागेल. आदरणीय मीनाताईंना भावांजली.

अॅड बाबुराव कानडे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..