थोडा रिकामा दिसलो रे दिसलो
की एखादा शब्द येतो कुठूनतरी
त्याला थोडं गुणगुणलं
कि अजून दुसरा
मग तिसरा
असे येत राहतात
फेर धरतात
मी सुद्धा
जास्त विचार करत नाही
शब्दांना येऊ देतो मग लिहून घेतो
मला बरं वाटते …छान वाटते
ते काही म्हणत नाही
अन मीही काही म्हणत नाही
हे सारं कविता आहे
की अजून दुसरं काही म्हणून
पण
एवढं मात्र खरं
कि
हे शब्द येत राहतात मराठीतून
………दुसऱ्या भाषेतून येतच नाही
इतकं सहज आलंच नाही अजून
— श्रीकांत पेटकर
Leave a Reply