नवीन लेखन...

मराठीची ऐशीतैशी

 

मराठी भाषा वाचवा म्हणून
इंटरस्कूल कॉंपीटिशन
आमच्या बॉबीचं झालं सिलेक्शन
आलं मलाच खूप टेंशन

तिनं मिळवलं फर्स्ट प्राईझ
नि सर्वांना केलं सरप्राईज

तसे दिले होते तिला
मीच मेन पॉईंटस् लिहून
आणि लॉट ऑफ प्रॅक्टीस
घेतली होती करवून

जाताना तिला केलं
बेस्ट लक वीश
चिअरअप करताना घेतला
हलकासा किस

मात्र स्टेजवर तिनं केलं
वंडरफुल प्रेझेंटेशन
नि अॅट्रॅक्ट केलं
ऑडियंसचं अटेंशन

अहो, ज्ञानेश्वर तुकाराम
एकनाथ, केले कोट
ऐकून एक्झामिनरने
घातले तोंडात बोट

तेव्हा झाला होता
थोडा फार घोटाळा
ज्ञानेश्वरी ग्रंथ
इंद्रायणीत बुडवला

रिअली, कुणालाही कळली
नाही छोटी गफलत
कॉंन्व्हेंट मराठीची
हीच असते गम्मत

तिचे डॅड झाले एकदम खूष
म्हणाले घेऊया ड्रेस नि शूज
तू आमची गुड्डी, गुड गुड गर्ल
या सनडेला जाऊ पहायला
एस एल वर्ल्ड

— सुधा मोकाशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..