यादवकाळात महानुभाव व वारकरी या पंथांनी मराठीचा प्रसार करण्याची मोलाची कामगिरी पार पाडली. हे कार्य आजही सुरुच आहे. महानुभाव पंथातील चक्रधरस्वामींशी संबंधित `लिळाचरित्र (१२३८)’ हे मराठीतील आद्य साहित्याचे महत्त्वाचे उदाहरण आहे. त्यानंतर संत ज्ञाानेश्वरांनी `भावार्थदीपिका’ अर्थात `श्री ज्ञानेश्वरी’ लिहिली.
वारकरी पंथातील संत कवी एकनाथ (१५२८ ते १५९९) यांनी भावार्थ रामायणाद्वारे मराठीतून समाजोपयोगी संदेश दिले. त्यानंतर संत तुकारामांनी (१६०८ ते १६४९) मराठीतून अभंगनिर्मिती करुन मराठी भाषेत मोलाची भर घातली. १८ व्या शतकात रघुनाथ पंडित, वामन पंडित, श्रीधर पंडित आणि मोरोपंत यांनी मराठी साहित्यात अनमोल भर घातली.
Leave a Reply