नवीन लेखन...

संगीतकार दशरथ पुजारी

Marathi Music Director and Singer Dashrath Pujari

मराठी संगीतकार दशरथ पुजारी यांचा जन्म ३० ऑगस्ट १९३० रोजी झाला.

दशरथ पुजारी हे एक उत्तम संगीतकार आणि तितकेच उत्तम गायक होते. बार्शीच्या गोपाळराव भातंब्रेकर गुरुजींकडून दशरथ पुजारी यांनी संगीताचे व गायनाचे धडे घेतले. वयाच्या अवघ्या १८ वर्षांपासूनच त्यांनी संगीत दिग्दर्शनातील कारकीर्दीस सुरुवात केली.

खरे तर दशरथ यांना पुजारी शास्त्रीय संगीतात पुढे वाटचाल करायची होती पण विधिलिखित काही वेगळेच होते. पुढे काही गोष्टी अशा घडल्या की ते भावगीतांकडे वळले आणि मग मराठी भावगीतांना एक अवीट गोडीचा गायक आणि उत्तम संगीतकार लाभला. गायक म्हणून त्यांना जास्त संधी मिळाली नाही तरी त्यांनी गायलेली सगळीच गाणी विलक्षण गाजली. त्यामानाने संगीतकार म्हणून तर त्यांची कारकीर्द खूपच भव्य झालेय.

दशरथ पुजारी ह्यांनी स्वत: गायलेली गाणी तशी खूपच कमी आहेत. वर सांगितलेले ‘अशीच अमुची आई असती ‘ तसेच ‘ अजून त्या झुडपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते ‘ किंवा ‘हरी भजनाविण काळ घालवू नको रे ‘ हे भक्तिगीत काय, ही सगळी गाणी गाजलेली आहेत.

त्यांनी संगीतबद्ध केलेली अवीट गोडीची आणि गाजलेली कैक गाणी सुमन कल्याणपूर आणि माणिक वर्मा ह्यांनी गायलेली आहेत.

दशरथ पुजारी यानी आपल्या प्रदीर्घ संगीत कारकीर्दीत मंगेश पाडगावकर, रमेश आणावकर, शांताराम नांदगावकर, सुधांशु, योगेश्वीर अभ्यंकर, मधुकर जोशी यांसारख्या गीतकारांच्या गाण्यांना चाली बांधल्या. ‘झिमझिम झरती श्रावणधारा’, ‘अशीच अमुची आई असती’, ‘चल ऊठ रे मुकुंदा’, ‘केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा’, ‘मृदुल करांनी छेडित तारा’ इत्यादी गाणी त्यांच्या अतिशय गाजलेल्या गाण्यांपैकी आहेत.

त्यांनी ‘अजून त्या झुडपांच्या मागे’ हे आत्मचरित्रपर पुस्तकही लिहिले आहे.

कवी पी. सावळाराम हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना तसेच ‘चतुरंग संगीत सन्मान ‘ पुरस्कार मिळाला होता.

दशरथ पुजारी यांचे १३ एप्रिल २००८ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

मा. दशरथ पुजारी यांची गाजलेली काही गाणी
अजून त्या झुडुपांच्या मागे
अभंगाची गोडी करी ज्यास वेडी
अशीच अमुची आई असती
एक तारी सूर जाणी
केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा
गोकुळाला वेड लाविले
चल ऊठ रे मुकुंदा
जगी ज्यास कोणी नाही
जनी नामयाची रंगली कीर्तनी
झिमझिम झरती श्रावणधारा
ते नयन बोलले काहीतरी
देव माझा विठू सावळा
नकळत सारे घडले
नंदाघरी नंदनवन फुलले
मुरलीधर घनश्याम
मृदुल करांनी छेडित तारा
या झोपल्या जगात
या मीरेचे भाग्य उजळले
रे क्षणाच्या संगतीने
रंगरेखा घेउनी मी
सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले
क्षणभर उघड नयन देवा

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..