नवीन लेखन...

मराठी कादंबरीकार रणजित देसाई

मराठी कादंबरीकार रणजित देसाई यांचा जन्म ८ एप्रिल १९२८ रोजी कोवाड कोल्हापूर येथे झाला.

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी, या कादंबऱ्यांना मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील त्यांची ‘श्रीमान योगी’ ही मराठीतील एक श्रेष्ठ कादंबरी गणली जाते.

‘श्रीमान योगी’ कादंबरीत महाराजांच्या या पराक्रमाविषयीची नोंद पुस्तकात आहेच, पण एक पिता म्हणूनही त्यांची वेगळी मांडणी आहे. ‘ स्वामी’ ही माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील ही कादंबरीही वाचनीय आहे. इतिहास सांगताना त्याची अतिशय रंजक मांडणी देसाईंनी या पुस्तकात केली आहे. श्रीमान योगी व स्वामी या दोन्ही पुस्तकांची भारतीय साहित्य अकादमीने हिंदीत भाषांतरे केली आहेत. याशिवाय देसाईंची ‘पावनखिंड’ ही आणखी एक ऐतिहासिक कादंबरी. त्यांची ‘राधेय’ ही कर्णावरची कादंबरीही लोकप्रिय आहे. राजा रविवर्मा या श्रेष्ठ भारतीय चित्रकारावरील चरित्रात्मक कादंबरी आवर्जून वाचण्यासारखी आहे.

देसाईंनी फक्त ऐतिहासिक साहित्य लिहिले असे नाही. ग्रामीण साहित्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. सवाल माझा ऐका, रंगल्या रात्री या गाजलेल्या चित्रपटांच्या कथाही त्यांनीच लिहिल्या. त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले. १९७३ मध्ये पद्मश्री देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या स्वामी कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. १९९० मध्ये त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

रणजित देसाई यांचे ६ मार्च १९९२ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..