मराठी चित्रकार जनार्दन दत्तात्रेय गोंधळेकर यांचा जन्म २१ एप्रिल १९०९ रोजी अमरावती येथे झाला.
ज.द. गोंधळेकर यांचे शालेय शिक्षण पुण्यात नूतन मराठी विद्यालयात झाले. १९२६ साली मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर चित्रकलेचे पद्धतशीर शिक्षण घेण्यासाठी ते जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या प्रसिद्ध कला शिक्षणसंस्थेत दाखल झाले. १९३१ साली त्यांनी ‘जी.डी. आर्ट’ हा पदविका अभ्यासक्रम पुरा केला.
१९३७ साली गोंधळेकर लंडनच्या ‘स्लेड स्कूल ऑफ फाइन आर्ट’ या शिक्षणसंस्थेत शिकण्याकरता रवाना झाले. तेथे त्यांनी ‘डिप्लोमा इन फाइन आर्ट’ पदविका अभ्यासक्रम पुरा केला. त्यानंतर त्यांनी पॅरिसच्या ज्युलियन अकादमीमधून शिकून रंगचित्रकलेचे यंत्र आणि कौशल्य आत्मसात केले. पेंटिग्ज आणि अशाच कलात्मक वस्तूंचे जतन कसे करावे हे शिकण्यासाठी गोंधळेकर बेल्जियमच्या Laboratoria Centrale des Musees de Belgique या संस्थेत दाखल झाले.या शिक्षणासाठी इ.स. १९५०मध्ये युनेस्कोने त्यांना शिष्यवृत्ती दिली होती.
परदेशांमधून शिकून १९३९ साली गोंधळेकर भारतात परतले. भारतात परतल्यानंतर गोंधळेकरांनी चित्रपटांत कलादिग्दर्शनाची कामे केली; तसेच व्यावसायिक चित्रनिर्मितीही सुरू केली. मात्र १९५३ साली ज्या ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये ते शिकले होते, तिच्याच ‘डीन’पदावर नेमणूक होण्याचा मान त्यांना लाभला. विदेशांतील शिक्षणकाळात केलेल्या निरीक्षणांवर विचार करून त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या अभ्यासक्रमांत कालसुसंगत सुधारणा घडवून आणल्या. १९५९ साली तुलनेने अल्पशा कारकीर्दीनंतर त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे डीनपद सोडले.
ज.द. गोंधळेकर हे टाइम्स ऑफ इंडियाचे कलादिग्दर्शक होते. ते चांगले शिक्षक, संस्थाचालक आणि दूरदृष्टी असलेले कलावंत होते. जर्मनी, बेल्जियम या देशांत आणि लॅटिन अमेरिकेत भरलेल्या अनेक चित्रप्रदर्शनांत गोंधळेकरांची चित्रे झळकली आहेत. गोंधळेकरांची ५०-६०चित्रे जगातील कलादालनांची शोभा वाढवत आहेत.
निवृत्तीनंतरदेखील गोंधळेकर मराठी विश्वकोश, शासकीय कलाशिक्षण विभाग इत्यादींतून चित्रकलाविषयक कामांत सक्रिय राहिले.
ज.द. गोंधळेकर यांचे ४ डिसेंबर १९८१ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे ज.द. गोंधळेकर यांना आदरांजली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply