सर्व बाजूनी नितीन गडकरी यांना पाठींबा मिळत आहे.नितीन गडकरी यांची कामाची हातोटी विलक्षण आहे.मोदी यांच्या एककल्ली ,दुराग्रही आणि ‘स्वयंघोषित कर्तृत्ववान ‘ अशी प्रतिमा खुद्द त्यांच्याच पक्षाच्या अनेक लोकांना मान्य नाही.त्यामुळे गडकरी यांचे नाव पुढे येत आहे.मोदी शहा यांचे राजकारण या पुढे चालणार नाही .सर्वांना एकत्र घेवून जाणारा नेता म्हणून गडकरींना विरोधी पक्षाचे नेते पण मान्यता देतील .
काही अकलेचे कांदे गडकरी यांच्या ऐवजी त्या योगी आदित्यनाथ यांचे नाव मोदी यांच्या नंतरचा भावी पंतप्रधान म्हणून पुढे करतात ही अत्यंत शरमेची गोष्ठ आहे.
जर भा ज पा ला बहुमत मिळाले नाही आणि सर्व विरोधी पक्षाच्या तर्फे पंतप्रधान पदा साठी एकच उमेदवार देण्याचे ठरले तर महाराष्ट्रातील खासदारांनी एकत्र येवून शरद पवार यांच्या साठी लॉबिंग केले पाहिजे. ती ममता ,मायावती अखिलेश हे काय देशाचे पंतप्रधान होण्याच्या लायकीचे आहेत काय ? कुठल्याही परिस्थितीत या वेळी मराठी पंतप्रधान झाला पाहिजे.
पानिपत चा आणि १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धातला पराजय हा शेवटला ठरला पाहिजे .आता देशाची सूत्र महाराष्ट्राच्या हाती देवून तर पहा .न भूतो न भविष्यती अशी प्रगती हा महाराष्ट्र देशा साठी घडवून आणेल.
दिल्लीचा बादशहा जेव्हा गलितगात्र झाला होता त्यावेळी महादजी शिंदे यांच्या हाती दहा वर्षे दिल्लीची प्रशासकीय सत्ता होती.पण महादजींनी कच खाल्ली .त्याच वेळी त्यांनी दिल्लीवर कब्जा करून मराठ्यांच्या हातात सर्व हिंदुस्थानची सत्ता घ्यायला हवी होती .पण त्यावेळी सुद्धा महाराष्ट्रातून महाद्जींना हवा तसा पाठींबा मिळाला नाही ……नाहीतर इतिहास बदलला असता.आता तरी पराभूत मानसिकतेचा त्याग झाला पाहिजे .
COME WHAT MAY …..!!!!
या पुढे मराठी पंतप्रधान हवा ….देश बदलला पाहिजे .
— चिंतामणी कारखानीस
Leave a Reply