नवीन लेखन...

सुप्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत

सुप्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांचा आज जन्मदिवस….4 जानेवारी
इंदिरा संत यांची कविता पहिली की आपण एक वेगळ्याच विश्वात जातो , तिथे फक्त शब्द असतात आणि मनाला मिळणारी अनुभूती. इंदिरा संत यांचा जन्म ४ जानेवारी १९१४ साली कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील तवण्डी शहरात झाला. त्यांचे शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम कॉलेज मध्ये तसेच पुण्याच्या फर्ग्युसन कॉलजमध्ये झाले.तेथे त्यांची भेट श्री. नारायण संत यांच्याशी झाली. पुढे त्यांनी त्यांच्याशी विवाह केला.
इंदिरा संत यांच्या कवितेतून स्त्री जीवनाचे अनेक पैलू दिसतात अगदी स्त्रीच्या प्रेमापासून ते तिच्या सोसण्यापर्यंतचे. इंदिरा संत याचे शेला, मेंदी, मृगजळ, मरवा ,निवारा असे अनेक काव्यसंग्रह प्रसिदध प्रसिद्ध आहेत. त्यांनी ऐकून २५ पुस्तके लिहिली. १९४६ साली त्यांचे पती नारायण संत यांचे निधन झाले. त्यानंतरच्या अनेक कवितात पतीवियोगाचे दुःख प्रतिबिबित झालेले दिसते. इंदिरा संत यांचा स्वभाव शांत , हळवा आणि चिंतनशील होता. त्यांना मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत हार पत्करावी लागली कारण त्यांच्याकडे निवडणूक जिंकण्याचे चातुर्य नव्हते की त्यासाठी जे काही लागते ते नव्हते. त्याचा हा पराभव त्यावेळी महाराष्ट्राच्या जिव्हारी लागला होता. त्याची कविता , त्यांचे लेखनच यासाठी महत्वाचे आहे अशी त्यांचे भाबडी समजूत होती. मला आठवतंय मी त्यांना नाशिकला जनस्थान पुरस्काराच्यावेळी भेटलो होततेव्हा त्यांना बघीतल्यावर समईमधील एक वात मंदपणे तेवत आहे. एक वेगळाच ऑरा म्हणतात तसा त्याच्या चेहऱ्याभोवती जाणवला. आज इतक्या वर्षणानंतरही मी ते तेज विसरू शकत नाही.
इंदिरा संत याना साहित्य अकादमीचा पुरस्कार , महाराष्ट्र राज्य पुरस्कार तसेच कुसुमाग्रजाचा जनस्थान पुरस्कार लाभला होता. आजही इंदिरा संत यांची कविता वाचली जाते , अभ्यासली जाते. त्यांचे मराठी कवितेत स्थान उच्च दर्जाचे आहे.
अशा या इंदिरा संत यांचे १२ जुलै २००० साली निधन झाले.
— सतीश चाफेकर
Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..