आपल्या कलाकृतीनं जाणकारांचं लक्ष वेधून घेणारे कलावंत फार थोडे असतात. सामाजिक विषय समर्थपणे पडद्यावर जिवंत करणारे नवीन पिढीतील दिग्दर्शक गजेंद्र अहिरे हे त्यापैकी एक. आपल्याला काय सांगायचंय, ते कसं मांडायचं आहे याचा पक्का आराखडा गजेंद्र अहिरे यांच्या डोक्यात असतो.
गजेंद्र अहिरे यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९६९ रोजी झाला. त्यांनी मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून एम.ए. पदव्युत्तर शिक्षण पुरे केले. त्यांनी कॉलेजमधील विविध कार्यक्रम, एकांकिका, नाटके यांमधून भाग घ्यायला सुरुवात केली. वर्षाला पाच-सहा एकांकिकांमधून कामं केल्याने त्यांना खूप अनुभव मिळाला. ‘आईचं घर उन्हाचं’ हे व्यावसायिक रंगभूमीवरील हे त्यांचे पहिलं नाटक.
मालिकांसाठीही त्यांनी खूप लिखाण केलं, काही मालिकांसाठी हजार-बाराशे भागांपर्यंत लिखाण केले आहे. रुईया महाविद्यालयात असताना त्यांनी लिहिलेल्या व संजय नार्वेकर याने दिग्दर्शिलेल्या कथा ओल्या मातीची नावाच्या नाटकात अभिनय करणाऱ्या वृंदा पेडणेकर यांच्याशी त्यांची ओळख झाली. या ओळखीतून पुढे त्यांचे लग्न झाले. त्याची पत्नीय अभिनेत्री वृंदा गजेंद्र ह्या पण अभिनेत्री आहेत. शेवग्याच्या शेंगा, अनुमती, द सायलेन्स, अनवट, नॉट ओन्ली राउत,गुलमोहर, टुरिंग टॉकीज, पोस्टकार्ड, पिपाणी, निळकंठ मास्तर,शासन, विठ्ठ्लाच्या आळंदी-पंढरपूर वारीचे चित्रण करणारा “विठ्ठल विठ्ठल’ असे गजेंद्र अहिरे यांनी ३५ हून अधिक चित्रपट काढले आहेत.
गजेंद्र अहिरे हे कवी पण आहेत, त्यांनी सरीवर सरी कृष्णाकाठची मीरा, नॉट ओन्ली मिसेस राऊत, पांढर, सैल या चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. आणि पारितोषिकेही मिळाली. या पारितोषिकांमध्ये राज्य शासनाच्या दोन पुरस्कारांचा समावेश आहे.
मराठीतले चार दिग्दर्शक एकत्र येऊन चार लघुकथांवर आधारित ’बायोस्कोप’ हा चित्रपट आला होता. त्यांतली दिल एक नादान ही कथा गजेंद्र अहिरे यांची होती. एक ज्येष्ठ गायिका, आज एकाकी जीवन जगत आहे. त्यांच्याबरोबर साथीला आहे तो एक सारंगी वादक. तो ज्या आत्मियतेने त्यांना सारंगीवर साथ करत असेल त्याच आत्मियतेने त्यांना जीवनातल्या या एकाकीपणातही साथ देत असतो. त्यानंतर मग त्यांनाच एका पत्राद्वारे निवृत्ती वेतनासाठी आता तुम्ही पात्र आहात असं पत्र येतं. या पत्रानं आपण आता खरोखरच निवृत्त झालो आहोत की, या जाणिवेने दोघांचीही झालेली घालमेल. हा या पहिल्या कथेचा विषय. यात नीना कुलकर्णी व सुहास पळशीकर यांनी तर आपल्या अभिनयाने हा चित्रपट एका वेगळय़ाच उंचीवर नेऊन ठेवला आहे. त्यांच्या गुलमोहर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे नामांकन प्राप्त झाले होते.
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘द सायलेन्स’ या चित्रपटाने महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळवला होता व कांस चित्रपट महोत्सवात पोहोचला होता. प्रदर्शित होण्याआधीच या सिनेमाने जगातील बऱ्याच नामांकित समजल्या जाणाऱ्या चित्रपट महोत्सवांमध्ये आपले नाव कोरले होते. जर्मन, ब्राझील, सिनेब्राझीलीया, इफ्फी ,दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट, मामी फिल्म फेस्टिवल, महाराष्ट्र राज्य पुरस्कारानंतर द सायलेन्स चित्रपट फ्रांसमध्ये दाखविला होता. हा सिनेमा त्या वर्षीच्या सगळ्याच चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुकाला पात्र ठरला होता.
त्यांनी शेवग्याच्या शेंगा हा सिनेमा तीन-चार दिवसांत लिहून पूर्ण केला होता. त्यांचे रेकॉर्ड आपल्या त्यांनी नाट्यलेखनात मोडला आहे. अत्यंत जलदगतीनं सिनेमा करणारा अशी गजेंद्र यांची ख्याती आहे. आपल्या गतीचा विक्रम त्यांनी नाट्यलेखनात मोडला आहे. हाती काही नसताना अवघ्या तीन तासांत त्यांनी नाटक लिहून पूर्ण केले. गजेंद्र अहिरे यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply