प्रकाश घांग्रेकर मराठी संगीत रंगभूमीवरील गायकनट होते. प्रकाश घांग्रेकर मुळचे पुण्याचे.संगीत नाटकाची कारकीर्द घडवण्यासाठी १९६० साली मुंबईला आले.धारदार आवाज,देखणे व्यक्तिमत्व पल्लेदार ताना घेण्याची कसब या मुळे त्यांच्या भूमीका प्रभावी होत.देवियाच्या द्वारी या नाटकातून त्यांची कारकीर्दची सुरवात झाली.
मानिनी त्यांनी संगीत सौभद्र, सुवर्णतुला, मदनाची मंजिरी, गोरा कुंभार, कट्यार काळजात घुसली या नाटकांत भूमिका केल्या. मानिनी सोडतुझा अभिमान, मजला नसे निवारा, घेई छंद मकरंद , सुरत पियाबिन या नाट्यपदांवर प्रकाश घांग्रेकर यांनी आपला ठसा उमटवला होता. गीत गाती ज्ञानेश्वर या नाटकातील भूमिका वाखाण्याजोगी होती. या नाटकातील एक तत्व नाम हे पद त्यांनी गाजवले होते. त्यांना बालगंधर्व पुस्कार व संगीत नाट्य स्पर्धेत रौप्य पदक मिळाले. प्रकाश घांग्रेकर यांचे १ एप्रिल २००३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
प्रकाश घांग्रेकर यांची गाणी.
अवघे गर्जे पंढरपूर, कटु योजना ही, केशवाचे भेटी लागलेंसे कांता वंचिता निज पतिता, तूंचि दिव्यांगना, ब्रह्म मूर्तिमंत, मानिनी सोड तुझा अभिमान, रमणि मजसि निजधाम लहरी अता सुखाच्या, सदा कलहाविना, सुखमय आशा, ही बहु चपल वारांगना, हो तनय काल
संगित विद्याविद्याहरण. पद:मद्यमद छोरी गायक प्रकाश घांग्रेकर . सूरलोक नाट्यसंगित ने publish केली होती. या गाण्याच्या शोधात आहे बर्याच वर्षापासून. आपल्याकडे मिळेल का?