वृत्तपत्रे, पुस्तके, साप्ताहिके वगैरे वाचतांना किवा रेडियो ऐकतांना, टीव्ही पाहतांना, रस्त्याने चालतांना दुकानाच्या पाट्या वाचतांना जवळजवळ सर्वच देशात पाळली जाते. मराठी समाजही अपवाद नाही. आनुवंशिकतेचे साधर्म्य दर्शविण्यासाठी, कुटुंबांच्या आडनावांची प्रथा, मुळात रूढ झाली असावी. परंतू कालांतराने या प्रथेचा गैरवापर होऊन विचित्र, विक्षिप्त, लाजिरवाणी, भयानक आणि हास्यास्पद आडनावे निर्माण झाली आणि ती पिढ्यानपिढ्या चालूही राहिली. अशी आडनावे त्या त्या कुटुंबांनी कशी स्वीकारली आणि पिढ्यानपिढ्या कशी चालू ठेवली हे एक गूढच आहे. या पैलूवर संशोधनाची आवश्यकता आहे.
मराठी आडनावे किती विविध प्रकारची आणि अर्थांची आहेत याची थोडीशी कल्पना पुढील यादी वाचून यावी.
ढेकणे, आळशी, पोटदुखे, आगलावे, बंदसोडे, अक्करबोटे, दहातोंडे, झगडे, गाढवे, डुकरे, कुत्रे, चिलटे, डास, घोडे, एडके, बकरे, लाजाळू, एकशिंगे, बारशिंगे, चाटुफळे, चणेचोर, दीडमिशे, उंदरे, झुरळे, हगवणे, हगरे, पातळहागे, उताणे, उपडे, रेडे, टणक, बेरड, प्राणजाळे, ढोरे, ढोरमारे, माणूसमारे, बापमारे, हडळ, भूत, ब्रम्हराक्षस, कुंभकर्ण, आडनटवे, उकिर्डे, उपाशी, भुकेले, बारलिंगे, कचरे, कंगाल, कानकाटे, कानतुटे, कानतोडे, कानपिळे, कानफाटे, कानफाडे, पोटफाडे, किडे, किरकिरे, कोडगे, कोंबडे, खेकडे, गधडे, गधे, गालफाडे, गालफुगे, गांडोळे, गीध, गुपचुप, गेंडे, गोतमारे, घमंडे, घरबुडवे, घरमोडे, घरलुटे, भामटे, भिकारी, घाणे, घोटाळे, घोडमुखे,
चकणे, चिकटे, चुळभरे, चोर, चोरटे, चोरपगार, चोरमुले, चोरे, रगतचाटे, दशपुत्रे, वीसपुते वगैरे.
यासारखी कित्येक मराठी आडनांवे सध्या प्रचलित आहेत. काही नावे तर इतकी अश्लील आहेत की ती उच्चारणे देखील असभ्यपणाचे ठरेल. अशासारखी विचित्र, भयंकर, हास्यास्पद, निंदाजनक, किळसवाणी, अश्लील आणि लाजिरवाणी आडनावे धारण करून समाजात वावरणार्या मुलां-मुलींना, लेकी-सुनांना टीका, निंदा, हेटाळणी आणि टिंगल यांना सतत तोंड द्यावे लागते, किती मन:स्ताप सहन करावा लागतो याची कल्पनाच करता येत नाही. विवाह जुळवितांना असल्या पकारच्या आडनावामुळे समस्या निर्माण होतात. मुलीला मुलगा पसंत असतो पण त्याचे आडनाव पसंत नसते. त्यामुळे अशी आडनावे बदलण्याची आवश्यकता आहे. माझ्या आडनावकोशातून अशी सर्व आडनावे घेतल्यास ती यादी 4-5 पानांची तरी होईल.
तरी पण ती आडनावे पिढ्यानपिढ्या आपल्या नावासमोर लावली जाताहेत आणि पुढील पिढ्यात ती लावली जाणारही आहेत. आज जरी कुटुंबातील व्यक्ती ही आडनावे अभिमानाने आपल्या व्यक्ति नामांसमोर लावीत असल्या तरी कांही पिढ्यानंतर ती बदलली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरीचशी आडनांवे अशा रितीने नामशेष होण्याची शक्यता आहे. दत्तक गेलेल्या किंवा कायदेशीररित्या स्वीकारित (Legaly Adopted) मुलामुलींचीही आडनावे बदलतात. तेव्हा सद्य काळातील प्रचलित आडनावांची जंत्री उपलब्ध व्हावी या हेतूने आडनांव कोश करण्याचे ठरविले. मराठी ज्यांची मातृभाषा आहे अशा कुटुंबांच्या आडनावांची अक्षक्रमाने केलेली यादी किंवा जंत्री हा या आडनाव कोशाचा मूळ गाभा आहे. मराठी मातृभाषा हाच निकष ठरविला. त्या कुटुंबाचा धर्म कोणता किंवा नागरिकत्व कोणत्या देशाचे आहे हे विचारात घेतले नाही.
मराठी ज्यांची मातृभाषा आहे अशा कुटुंबांच्या आडनावांची, अक्षरानुक्रमे यादी, 3 मे 1963 पासून, म्हणजे माझ्या 30 व्या वाढदिवसापासून, एका डायरीत लिहीण्यास सुरूवात केली. हीच मराठी आडनावकोशाची सुरूवात. ऑगस्ट 1970 पर्यंत 6 हजार, नोव्हेंबर 1972 पर्यंत 8 हजार तर 1973 च्या जून महिन्यापर्यंत जवळजवळ 10 हजार आडनावे जमा झाली होती. सध्या हा आकडा 60 हजारापर्यंत पोचला आहे.
वैशिष्ठ्यपूर्ण, लक्ष्यवेधी, विचित्र, आगळेवेगळे असे एखादे आडनाव, ऐकण्यात किंवा वाचनात आले की ते, अक्षरानुक्रमे कागदावर लिहून ठेऊ लागलो आणि मराठी आडनावांची यादी भराभर वाढत जाऊन बघताबघता तिचे आडनावांच्या संग्रहात केव्हा रूपांतर झाले कळलेही नाही. मराठी आडनावांचा संग्रह करण्याचे, मनस्वी आनंद मिळविण्याचे जणू व्यसनच लागले.
आडनावे कुठून आणि कशी मिळविली आणि त्यांचे संदर्भ कसे जतन केले आहेत?
मित्रमंडळी, मासिके, पुस्तके, प्रसारमाध्यमे, सोसायट्यांचे अहवाल, ज्ञातिसंस्थांचे अहवाल, मतदारांच्या याद्या वगैरेत मराठी मातृ भाषिकांची आडनावे आढळली. वृत्तपत्रांची कात्रणे कागदांवर चिकटवून ठेवली, नंतर प्रत्येक आडनावाची एक चिठ्ठी करून त्या सर्व चिठ्ठ्या अक्षरानुक्रमे लावून अक्षरानुक्रमे याद्या तयार केल्या. त्यामुळे आडनावाची द्विरूक्ती टाळता आली. प्रत्येकचिठ्ठीवर आडनाव उपलब्धीचा तारीखवार तपशील ठेवला. प्रत्येक आडनावाचा संदर्भ असावा म्हणून प्रत्येक आडनावासाठी एक कार्ड छापून घेतले आहे. कात्रणे आणि याद्या यांच्या फायलींना यादी संदर्भ क्रमांक दिले आहेत.
जनताजनार्दनाचे सहकार्य
माझ्या मराठी आडनावांचा संग्रह करण्याच्या छंदाचा, मित्रपरिवारात, बराच बोलबाला झाल्यामुळे, त्यांनाही या रोगाची लागण झाली आहे, तेही नवीन वैशिष्ठ्यपूर्ण आडनाव आढळले की लिहून ठेवतात आणि यादी बरीच मोठी झाली की ती मला देतात.
* 29 जून 1973 च्या दैनिक नवशक्तीच्या जनमनाचा कानोशात, मी एक पत्र लिहून वैशिठ्यपूर्ण मराठी आडनावे मला कळवावीत असे आवाहन केले. हे पत्र ‘आडनावांच्या शोधात’ ह्या मथळयाखाली नवशक्तीत प्रसिध्द झाले आणि ह्या पत्राला अपेक्षेपेक्षा खूपच जास्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून अनेक वाचकांनी स्वत:च टपालखर्च करून अक्षरश:हजारो आडनावे मला कळविली. प्रत्येक आडनावाची दखल घेऊन, कोशात त्यावेळेपर्यंत नसलेली आडनावे कोशात लिहून त्याप्रमाणे प्रत्येक पत्र प्रेषकाला पोच दिली. ही पत्रे अजूनही मी नीट जपून ठेवली आहेत. या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे.
* शनिवार 25 ऑगस्ट 1973 च्या ‘सकाळ’ या दैनिकात आडनावे कळवा या मथळ्याखाली माझे पत्र प्रसिध्द झाले. परंतू या पत्रास नगण्य प्रतिसाद मिळाला.
* फेब्रुवारी 1975 अमृत च्या अंकात ‘असा छंद असा आनंद ‘, मराठी आडनावांचा संग्रह, हा माझा लेख प्रसिध्द झाला. या लेखाला अुत्तम प्रतिसाद मिळाला आणि लेखासंबंधी वाचकांकडून खूपच चांगल्या प्रतिक्रीया अमृतला कळविण्यात आल्या. हा लेख खूपच वाचकप्रिय झाला, वाचकांचे मराठी आडनावाबद्दलचे कुतूहल जागृत झाले असे म्हणता येआील.
* रविवार 27 जून 1976 च्या महाराष्ट्र टाआीम्समध्ये ‘ मराठी आडनावांचा संग्रह ‘ हा माझा लेख प्रसिध्द झाला. वाचकाची पत्रे, म.टा.च्या माझेही मत या सदरात प्रसिध्द झाली,
* 12 जुलै 1991 च्या महाराष्ट्र टाआीम्समध्ये मी ‘मराठी आडनावांचे बरे-वाआीट अनुभव कळवा’, पहिल्या तीन अुत्कृष्ट अनुभवांना, मुंबआी मराठी ग्रंथसंग्रहालय, पंतनगर घाटकोपर (पूर्व) विभागातर्फे पुरस्कार देण्यात येतील असे अेक आवाहन केले. त्याला महाराष्ट्राच्या कानाकोपरर्यातून अुत्तम प्रतिसाद मिळाला. मुंबआीतील पत्रलेखकांना ग्रंथसंग्रहालयात बोलावून त्यांच्या अनुभवकथनाचा कार्यक्रम करून पुरस्कार दिले.
* आडनावांच्या नवलकथा असा विषय घेअून अनेक सामाजिक संस्थांत भाषणे दिली आहेत. त्यावेळी, आडनाव कोशासंबंधीच्या फाआीली, लेख, पत्रव्यवहार वगैरेंचे छोटेसे प्रदर्शन मांडून ठेवीत असतो. सुमारे अेक तासाचे भाषण आणि पंधरावीस मिनिटांचा प्रश्नोत्तरे, चर्चा आणि श्रोत्यांचे मतप्रदर्शन आणि आडनावांचे अुत्स्फूर्त अनुभवकथन असा मनोहारी कार्यक्रम रंगत असत.
मराठी आडनावे किती असतील?
सध्या जी आडनांवे कोशात आलेली आहेत त्यातील बव्हंशी कुठेना कुठे छापलेली निदर्शनास आली किवा मित्रपरिवाराकडून कळली. आडनावांची फार मोठी संख्या अप्रसिद्ध स्वरूपात आहे. निदान महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील मतदारांच्या याद्या अुपलब्ध झाल्यास कोशाचे काम बहुतांशी पूर्ण होअू शकेल. ज्या वेगाने आडनांवे अुपलब्ध होताहेत त्यावरून ठोबळमानाने असा अंदाज करता येतो की मराठी आडनांवे दीडलाखापेक्षाही अधिक असावीत. या संग्रहाचा फार मोठा फायदा असा झाला की, मराठी आडनावांचे अनेक पैलू माझ्या लक्षात आले आणि जवळजवळ त्या प्रत्येक पैलूवर आणि विचारमंथनातून वेळोवेळी प्रसारमाध्यमात लेख लिहीले, वाचकांना माझी अेक नम्र विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेअू नये. ज्या ज्या आडनावांचा मी अुल्लेख केला आहे ती आडनावे खरोखर प्रचारात आहेत, रूढ झालेली आहेत, म्हणूनच मी, ती विचारात घेतली आहेत, कुणाचाही अुपहास किवा निंदा नालस्ती करण्याचा माझा अुद्देश कधीही नव्हता आणि भविष्यात असणारही नाही.
आडनावांच्या नवलकथा…प्रसिध्द झालेले लेख व मुलाखती: गजानन वामनाचार्य.
01. असा छंद असा आनंद : मराठी आडनावांचा संग्रह : अमृत : फेब्रुवारी 1975.
02. मराठी आडनावांचा संग्रह : महाराष्ट्र टाआीम्स : रविवार 27 जून 1976.
03. आडनावांच्या नवलकथा : जोड आडनावे : माहेर : सप्टेंबर 1991 आणि अमृत : सप्टेंबर 1991.
04. आडनावांच्या नवलकथा : नावात-आडनावात बदल : स्त्री : अेप्रिल 1992.
05.व्यक्तीनावातील आणि आडनावातील परिवर्तन : अमृत : फेब्रुवारी 2003.
06. महाराष्ट्रीय आडनावात ‘वाघ’ आणि ‘गाय’ : अमृत : सप्टेंबर 2003.
07. आमचे आडनाव असे रूढ झाले : अमृत : नोव्हेंबर, दीपावली 2004.
08. आडनावात बदल : आपले जग : 16 डिसेंबर 2004.
09. थोरामोठ्यांची आडनावे : अमृत : जानेवारी 2005.
10. मराठी आडनावात ‘राम’ आणि ‘रावण’ : अमृत : फेब्रुवारी 2005.
11. मराठी आडनावे : सामाजिक सोय आणि गैरसोयही : किर्लोस्कर : मे 2005.
12. मराठी आडनावांच्या गमतीजमती : अमृत : जुलै 2005
13. आडनावांचा कोश : धांडोळा, तृप्ती दोंदे : लोकमुद्रा : रविवार 10 सप्टेंबर 2006.
14. मराठी आडनावे : सामाजिक बाब : ग्रंथसंपदा : अेप्रिल-मे 2007.
15. टीव्ही मुलाखत : 25 ऑक्टोबर 2008, सकाळ वाहिनी (साम)(काही फोटो आहेत)
16. मराठी आडनावांच्या नवलकथा : असेही कर : अमृत : जून 2010.
17. आडनावांच्या नवलकथा : कर भावी आडनावे : आपले जग : 20 सप्टेंबर 2010.
18. आडनावांवर चर्चा : सामना : 13 ऑक्टोबर 2010.
19. नावात काय आहे : हिंदुस्तान टाआीम्स, मेट्रो : 14 ऑक्टोबर 2010.
20. आडनाव नकोसे झालेय?: महाराष्ट्र टाआीम्स : 13 ऑक्टोबर 2010.
21. आडनावांमुळे अडताहेत लग्नाचे घोडे!: मुंबआी सकाळ :20 ऑक्टोबर 2010.
22. चित्र-विचित्र आडनांवे : शब्द दर्वळ : दिवाळी 2010.
23. टिव्ही मुलाखत : रंग माझा वेगळा : सह्याद्री वाहिनी : 10 नोव्हेंबर 2010.
24. टिव्ही मुलाखत : सलाम महाराष्ट्र : लोकमत वाहिनी : 12 नोव्हेंबर 2010
25. आडनाव बदलून घ्या : लोकमत : 3 डिसेंबर 2010.
26. नावात काय आहे : हार्मनी : डिसेंबर 2010.
27. आडनावात काय नाही? मुंबआी सकाळ : शनिवार, 29 जानेवारी 2011.
मराठी ज्या कुटुंबांची मातृभाषा आहे अशा कुटुंबांच्या आडनावांचा कोश मी संकलीत करीत आहे. आतापर्यंत सुमारे ६० हजार आडनावे संकलीत झाली आहेत. या संबंधात, सह्याद्री वाहिनीवर रंग माझा वेगळा या मालिकेत आणि आय् बी एम् लोकमत या वाहिनीवर माझ्या मुलाखतीही प्रसारीत झाल्या आहेत.
— गजानन वामनाचार्य
Leave a Reply