नवीन लेखन...

मराठी आडनाव : लेखांची सूची

२९ जून १९७३ च्या दैनिक नवशक्तीच्या जनमनाचा कानोशात, मी अेक पत्र लिहून वैशिठ्यपूर्ण मराठी आडनावे मला कळवावीत असे आवाहन केले. हे पत्र ‘आडनावांच्या शोधात’ ह्या मथळयाखाली नवशक्तीत प्रसिध्द झाले आणि ह्या पत्राला अपेक्षेपेक्षा खूपच जास्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून अनेक वाचकांनी स्वतःच टपालखर्च करून अक्षरशः हजारो आडनावे मला कळविली. प््रात्येक आडनावाची दखल घेअून, कोशात त्यावेळेपर्यंत नसलेली आडनावे कोशात लिहून त्याप्रमाणे प्रत्येक पत्रप्रेषकाला पोच दिली. ही पत्रे अजूनही मी नीट जपून ठेवली आहेत. या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे.

* शनिवार २५ ऑगस्ट १९७३ च्या ‘सकाळ’ या दैनिकात आडनावे कळवा या मथळ्याखाली माझे पत्र प्रसिध्द झाले. परंतू या पत्रास नगण्य प्रतिसाद मिळाला.

* फेब्रुवारी १९७५ अमृत च्या अंकात ‘असा छंद असा आनंद ‘, मराठी आडनावांचा संग्रह, हा माझा लेख प्रसिध्द झाला. या लेखाला अुत्तम प्रतिसाद मिळाला आणि लेखासंबंधी वाचकांकडून खूपच चांगल्या प्रतिक्रिया अमृतला कळविण्यात आल्या. हा लेख खूपच वाचकप्रिय झाला, वाचकांचे मराठी आडनावाबद्दलचे कुतूहल जागृत झाले असे म्हणता येआील.

* रविवार २७ जून १९७६ च्या महाराष्ट्र टाआीम्समध्ये ‘ मराठी आडनावांचा संग्रह ’ हा माझा लेख प्रसिध्द झाला. वाचकाची पत्रे, म.टा.च्या माझेही मत या सदरात प्रसिध्द झाली,

* १२ जुलै १९९१ च्या महाराष्ट्र टाआीम्समध्ये मी ‘मराठी आडनावांचे बरे-वाआीट अनुभव कळवा‘, पहिल्या तीन अुत्कृष्ट अनुभवांना, मुंबआी मराठी ग्रंथसंग्रहालय, पंतनगर घाटकोपर (पूर्व) विभागातर्फे पुरस्कार देण्यात येतील असे अेक आवाहन केले. त्याला महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून अुत्तम प्रतिसाद मिळाला. मुंबआीतील पत्रलेखकांना ग्रंथसंग्रहालयात बोलावून त्यांच्या अनुभवकथनाचा कार्यक्रम करून पुरस्कार दिले.

* आडनावांच्या नवलकथा असा विषय घेअून अनेक सामाजिक संस्थांत भाषणे दिली आहेत. त्यावेळी, आडनाव कोशासंबंधीच्या फाआीली, लेख, पत्रव्यवहार वगैरेंचे छोटेसे प्रदर्शन मांडून ठेवीत असतो. सुमारे अेक तासाचे भाषण आणि पंधरावीस मिनिटांचा प्रश्नोत्तरे, चर्चा आणि श्रोत्यांचे मतप्रदर्शन आणि आडनावांचे अुत्स्फूर्त अनुभवकथन असा मनोहारी कार्यक्रम रंगत असत.
मराठी आडनावे किती असतील?
सध्या जी आडनांवे कोशात आलेली आहेत त्यातील बव्हंशी कुठेना कुठे छापलेली निदर्शनास आली किवा मित्रपरिवाराकडून कळली. आडनावांची फार मोठी संख्या अप्रसिद्ध स्वरूपात आहे. निदान महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील मतदारांच्या याद्या अुपलब्ध झाल्यास कोशाचे काम बहुतांशी पूर्ण होअू शकेल. ज्या वेगाने आडनांवे अुपलब्ध होताहेत त्यावरून ठोबळमानाने असा अंदाज करता येतो की मराठी आडनांवे दीडलाखापेक्षाही अधिक असावीत.

या संग्रहाचा फार मोठा फायदा असा झाला की, मराठी आडनावांचे अनेक पैलू माझ्या लक्षात आले आणि जवळजवळ त्या प्रत्येक पैलूवर आणि विचारमंथनातून वेळोवेळी प्रसारमाध्यमात लेख लिहीले,

वाचकांना माझी अेक नम्र विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेअू नये. ज्या ज्या आडनावांचा मी अुल्लेख केला आहे ती आडनावे खरोखर प्रचारात आहेत, रूढ झालेली आहेत, म्हणूनच मी, ती विचारात घेतली आहेत, कुणाचाही अुपहास किवा निदानालस्ती करण्याचा माझा अुद्देश कधीही नव्हता आणि भविष्यात असणारही नाही.

आडनावांच्या नवलकथा…प्रसिध्द झालेले लेख व मुलाखतीः गजानन वामनाचार्य.

०१. असा छंद असा आनंद ः मराठी आडनावांचा संग्रह ः अमृत ः फेब्रुवारी १९७५.
०२. मराठी आडनावांचा संग्रह ः महाराष्ट्र टाआीम्स ः रविवार २७ जून १९७६.
०३. आडनावांच्या नवलकथा ः जोड आडनावे ः माहेर ः सप्टेंबर १९९१ आणि अमृत ः सप्टेंबर १९९१.
०४. आडनावांच्या नवलकथा ः नावात-आडनावात बदल ः स्त्री ः अेप्रिल १९९२.
०५. व्यक्तीनावातील आणि आडनावातील परिवर्तन ः अमृत ः फेब्रुवारी २००३.
०६. महाराष्ट्रीय आडनावात ‘वाघ‘ आणि ‘गाय‘ ः अमृत ः सप्टेंबर २००३.
०७. आमचे आडनाव असे रूढ झाले ः अमृत ः नोव्हेंबर, दीपावली २००४.
०८. आडनावात बदल ः आपले जग ः १६ डिसेंबर २००४.
०९. थोरामोठ्यांची आडनावे ः अमृत ः जानेवारी २००५.
१०. मराठी आडनावात ‘राम‘ आणि ‘रावण‘ ः अमृत ः फेब्रुवारी २००५.
११. मराठी आडनावे ः सामाजिक सोय आणि गैरसोयही ः किर्लोस्कर ः मे २००५.
१२. मराठी आडनावांच्या गमतीजमती ः अमृत ः जुलै २००५
१३. आडनावांचा कोश ः धांडोळा, तृप्ती दोंदे ः लोकमुद्रा ः रविवार १० सप्टेंबर २००६.
१४. मराठी आडनावे ः सामाजिक बाब ः ग्रंथसंपदा ः अेप्रिल-मे २००७.
१५. टीव्ही मुलाखत ः २५ ऑक्टोबर २००८, सकाळ वाहिनी (साम) (काही फोटो आहेत)
१६. मराठी आडनावांच्या नवलकथा ः असेही कर ः अमृत ः जून २०१०.
१७. आडनावांच्या नवलकथा ः कर भावी आडनावे ः आपले जग ः २० सप्टेंबर २०१०.
१८. आडनावांवर चर्चा ः सामना ः १३ ऑक्टोबर २०१०.
१९. नावात काय आहे ः हिंदुस्तान टाआीम्स, मेट्रो ः १४ ऑक्टोबर २०१०.
२०. आडनाव नकोसे झालेय?ः महाराष्ट्र टाआीम्स ः १३ ऑक्टोबर २०१०.
२१. आडनावांमुळे अडताहेत लग्नाचे घोडे!ः मुंबआी सकाळ ः २० ऑक्टोबर २०१०.
२२. चित्र-विचित्र आडनांवे ः शब्द दर्वळ ः दिवाळी २०१०.
२३. टिव्ही मुलाखत ः रंग माझा वेगळा ः सह्याद्री वाहिनी ः १० नोव्हेंबर २०१०.
२४. टिव्ही मुलाखत ः सलाम महाराष्ट्र ः लोकमत वाहिनी ः १२ नोव्हेंबर २०१०.
२५. आडनाव बदलून घ्या ः लोकमत ः ३ डिसेंबर २०१०.
२६. नावात काय आहे ः हार्मनी ः डिसेंबर २०१०.
२७. आडनावात काय नाही? मुंबआी सकाळ ः शनिवार, २९ जानेवारी २०११.

गजानन वामनाचार्य, घाटकोपर, मुंबआी

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..