नवीन लेखन...

मराठीची महती

मराठी आणि मराठी भाषाभिमान हा विषय निघतो तेव्हा १९२२ साली पुण्यात स्थापन झालेल्या महाराष्ट्र शारदा मंदिराचे व तिथे येणाऱ्या साहित्यिक मित्रांनी स्थापन केलेल्या रवी किरण मंडळाचे सदस्य आणि मराठीचा जाज्वल्य अभिमान असणाऱ्या माधव ज्युलियन याचे नाव प्रकर्षाने डोळ्यापुढे येते. नवीन पिढ्यांचा या नावाशी कितपत परिचय असेल कल्पना नाही.

“माधव ज्युलियन’ असं विचित्र नाव जरी ते लावायचे तरी त्यांचं खरं नाव माधव पटवर्धन होते. त्यांनी स्वत:च “अर्धे खिस्ती नाव पहाता परि हृदयाने हिन्दु मराठा’ असे म्हणून आपले मराठीपण सिध्द केले होते. नावाप्रमाणेच लिखाणांतही त्यांनी आपले वैशिष्ट्य जपले होते. आणि ड्‌. चा उच्चारानुरुप योग्य वापर करणं, ए, ऐ, इ, उ च्या मात्रा अ च्या वर खाली लिहिणे यात त्यांचे वेगळेपण उठून दिसायचे. शिवाय पर्शियन चे प्राध्यापक असल्याने त्यांच्या लिखाणात फारसी शब्द पण आढळत.

त्यांच्या कविता एकाहून एक सरस अशा आहेत पण ह्यांची प्रेमस्वरुप आई वात्सल्य सिंधु आई ही कविता तर हृदयाला भिडणारी होती. मला आज सुध्दा आठवतं की वर्गात जेव्हा ही कविता शिकवली जायची तेव्हा आई नसलेल्या मुली ढसाढसा रडत. महाराष्ट्र गीत, मराठी बाणा व आमुची मायबोली या त्यांच्या कविता तर मराठी भाषेबद्दलच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेल्या आहेत. १९२२ साली लिहिलेली आमुची मायबोली ही कविताच. पहा ना कशी भाषेच्या अभिमानाने भरलेली आहे.

आमुची मायबोली

मराठी असे आमुची .
मायबोली, जरी आज ती
राजभाषा नसे,

नसे आज जैश्चर्य या
माऊलीला, यशाची पुढे दिव्य
आशा असे
जरी पंचखण्डांतही मान्यता
घे स्वसत्ताबळे श्रीमती
अिड्‌.ग्रजी

मराठी भिकारीण झाली
तरीही कुशीचा तिच्या तीस
केवी त्यजी? ॥ १॥

जरी मान्यता आज हिन्दीस
देअी अुदेले नवे राष्ट्र हे
हिन्दवी

मनाचे मराठे मराठीस ध्याती
तिची जाणुनी योग्यता थोरवी
असं दुर पेशावरी अ॒त्तरी वा
असु दक्षिणी दूर तन्जावरी

मराठी असे आमुची
मायबोली, अहो ज्ञान देवीच
देखा खरी ॥२॥

मराठी असे आमुची
मायबोली जरी भिन्न
धर्मानुयायी असू

पुरी बाणली बन्धुता
अन्तरड्डी, हिच्या एक
ताटात आम्ही बसू

हिचे पुत्र आम्ही हिचे पांड्
फेडू, वसे आमच्या मात्र
हन्मन्दिरी

जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापें
हिला बैसवू वैभवाच्या शिरी ॥३॥

हिच्या लक्तरांची असे लाज
आम्हां, नका फक्त पाहू
हिच्या लक्तरां

प्रभावी हिचं रुप चापल्य देखा
‘पडावी फिकी ज्यापुढे अप्सरां

न घालूं जरी वाडू मयांतीतल
अुंच्ची हिरे मोतियांचे हिला दागिने

मराठी असे आमुची
मायबोली वृथा ही बढाओ
सुकार्या विणे ॥ ४॥

मराठी असे आमुची
मायबोली, अहो पारतन्त्र्यांत
ही खडूगली

हिची थोर संपत्ति गेली
अुपेक्षेमुळे खोल
कालार्णवाच्या तळी

तरी सिन्धू मन्थूनी काढूनि
रत्ने नियोजू तयांना हिच्या
मागुनी

नको रीणा देवोत देतील तेव्हा
जगातील भाषा हिला
खण्डणी ॥५॥

या कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे हिची गेयता आणि तिने ल्यायलेला अलंकार! हिचे वृत्त सुमंदारमाला असून त्याचं मंदारमाला व भुजंगप्रयातशी जवळचं नातं आहे असं म्हणतात.

मायबोलीचा नुसता अभिमान बाळगणं पुरेसं आहे का? छे! त्याकरतां तर मराठी बाणा अंगी रुजवायला हवा आणि म्हणूनच

“मराठा अन्याय कोठेहि
झाला, स्वदेशी विदेशी कुणी गाज्जले

मराठी कसा मी न सन्ताप
माझा जरी तीव्र दुक्खानिले?

मराठी जनांचेच वर्चस्व राहो
स्वत:च्या महाराष्ट्र देशी तरी

प्रसादे तुझ्या कोणती व्यक्त
आशा करुं हे वन्द्य वागीश्वरी?”

ह्या झाल्या सर्व अलिकडच्या गोष्टी! जरा बरंच मागे जाऊ या आणि मराठीचं कवतिक पाहूं या.

एकनाथ महाराजांनी भागवत लिहितांना संस्कृतचे अर्थ प्राकृत भाषेत आणले म्हणजे फार मोठं पाप झालं म्हणून काशीच्या शास्त्रीमंडळाने त्यांच्या अकृत्या चा पुकारा करुन त्यांना दंड देण्याचा ठराव केला होता परंतु त्यांचे वैराग्य,  अनुपम शांति, अलौकिक वक्तृत्व, विद्वत्ता वगैरे गुण पाहून विद्वान मंडळी सुध्दा
चकित झाली. आपल्याअकृत्या चे समर्थन करुन नाथ मराठी भाषेविषयी म्हणतात

“संस्कृत ग्रंथकर्ते ते
महाकवी! म्या प्रकृति काय
उणीवी?

नवी जुनी म्हणावे! कैसेनि
केंवि सुवर्णसुमने?

पूर्वी ज्ञानोबारायांनी व नंतर एकनाथ महाराजांनी मराठी भाषेचा पुरस्कार केला व मराठी भाषेत उत्कृष्ट ग्रंथ लिहून जनांचा उध्दाराचा मार्ग सोपा करुन ठेवला. संस्कृताभिमान्यांचा ठपका सोसून पण त्यांना न दुखवता नाथांनी काशीला म्हणजे संस्कृतच्या माहेर घरी मराठीचा माझी मराठी भाषा चोखडी ह्याप्रमाणे अभिमान बाळगून जयजयकार केला व करविला.

व्यक्तिगत रुपांत मला नेहमी वाटतं की अमृतातेहि जिंकील पैजा अशा सर्वांग सुन्दर असलेल्या मराठी भाषेची आपण निष्कारण चिंता करत आहोत ती अमरच राहणार आहे.

डॉ. अरुणा रांगणेकर, भोपाळ

उत्तम कथा (वर्ष – जुलै २०१८)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..