बॉलिवूडमध्ये स्वतःचा वेगळा ठसा निर्माण करणारी मराठमोळी विद्या माळवदे यांचा जन्म. २ मार्च १९७३ रोजी येथे झाला.
लॉचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्याने एअर होस्टेसच्या रुपात करिअरला सुरुवात केली होती.मात्र नशिबाने ती बॉलिवूडमध्ये आली आणि एअरहोस्टेसहून अभिनेत्री बनली. विद्याला शाहरुख खान स्टारर’चक दे इंडिया’या सिनेमासाठी ओळखले जाते. ‘चक दे इंडिया’या सिनेमात विद्याने गोलकिपरची भूमिका वठवली होती. विद्याने आपल्या करिअरची सुरुवात २००३ मध्ये विक्रम भट यांच्या’इंतेहा’या सिनेमाद्वारे केली होती.मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.त्यानंतर तिने आपला मोर्चा जाहिरातींकडे वळवला.२००७ मध्ये आलेल्या चक दे इंडिया या सिनेमातून तिला ओळख प्राप्त झाली. ‘माशूका’, ‘बेनाम’, ‘किडनॅप’, ‘तुम मिलो तो सही’, ‘आपके लिए हम’, ‘नो प्रॉब्लम’,’वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा’या सिनेमांसह ब-याच सिनेमांध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply