प्रख्यात अभिनेत्री “स्मिता पाटील”, यांचा काल स्मृतिदिन झाला त्यानिमित्त,—!!!
मराठमोळे सौंदर्य तुझे,
टपोरे हसरे डोळे,
चेहऱ्यावरती भाव झरती, आविर्भावही बोलके ,–!!!
चाफेकळी नाक तुझे, सामान्यातील नायिका तू ,
अवघ्याच स्त्रीजातीला, अभिमानास्पद वाटलीस तू ,–!!!
अभिनयातील शिखर गाठले, कर्तृत्वाने आगळे वेगळे,
सामाजिक भान जपले,
ते तर आणखी निराळे,–!!!
स्त्रीत्वाच्या अस्मिता सगळ्या,
नारी तितक्या परि,-साकारल्या ,
असामान्य कलेनेच केवळ,
किती भूमिका जिवंत केल्या,–!
इज्जत, अब्रू ,मानपान सारे,
स्त्रीला किती असती मोठे, वेळोवेळी सिद्ध केलेस,
पुरुषी जुलूम झुगारून ते,–!!!
आई, बहिण पत्नी,प्रेमिका,
आणि चित्रे कितीतरी,
कर्तव्य बजावत स्त्रीचे सगळे, उठून दिसलीस विद्युल्लतेपरि,–!!
अभिनय क्षेत्री जाहल्या किती, तारका पैशाला पासरी,
त्या सर्वात स्थान तुझे,
अढळ अशा ध्रुवपदी,–!!!
*अभिनय असावा कसा,
अंगोपांगी मुरलेला,
तू दाखवलेस जगा,
संयत, नेटका, नेमका*,–!!!
अल्पायुष्यातील कर्तृत्व ते,
आजही आम्हा आठवते,
जीव पुन्हा पुन्हा हळहळे, अचानक तुझ्या जाण्यामुळे,–!!!
© हिमगौरी कर्वे
Leave a Reply