ब्रिटनच्या पहिला महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९२५ रोजी लिंकनशायरमधील ग्रॅंथम येथे झाला.
मार्गारेट हिल्डा थॅचर यांना आयर्न ले़डी म्हणूनदेखील ओळखलं जात असं. मार्गारेट थॅचर उर्फ मार्गारेट हिल्डा रॉबर्ट्स वडिलांचे नाव अल्फ्रेड रॉबर्टस व आईचे नाव बिट्रेस होते. वडिलांच्या वर्तणुकीचा मार्गारेट यांच्यावर विशेष प्रभाव होता. १९५९ मध्ये मार्गारेट थॅचर उत्तर लंडनमधील फिंचले येथून कॉंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदार झाल्या. नंतर त्या शिक्षणमंत्री होत्या. १९७५ मध्ये त्यांनी तेव्हाचे पंतप्रधान एडवर्ड हिथ यांना आव्हान दिले आणि १९७९, १९८३ व १९८७ च्या निवडणुकांत विजय मिळविला.
१९७५ ते इ.स. १९९० या काळात हुजूर पक्षाच्या त्या अध्यक्षा होत्या. १९७९ ते ८० या कालावधीत त्यांच्याकडे देशाची सुत्रे आली. कॉंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या असलेल्या मार्गारेट थॅचर १९७९ ते १९९० या काळात पंतप्रधान होत्या. २० व्या शतकातील सर्वात अधिक काळ ब्रिटनचे पंतप्रधान पद भूषविणाऱ्या आणि आजवरच्या त्या एकमेव महिला पंतप्रधान होत्या.
निवडणुकीच्या माध्यमातून सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेल्या युरोपातील पहिल्या महिला. इंदिरा गांधी, सिरिमाओ भंडारनायके आणि मार्गारेट थॅचर या एकाच वेळी आपापल्या देशाच्या सर्वोच्च स्थानी होता. या तिघींचे मैत्रीसंबंध हाही त्यावेळी चर्चेचा विषय असे. एका रशियन पत्रकाराने त्यांना ‘पोलादी महिला’ म्हणून संबोधले आणि याच विशेषणाने त्या पुढे ओळखू जाऊ लागल्या. कणखर राजकीय निर्णय, बुलंद नेतृत्वक्षमता यामुळे त्या २० व्या शतकातील एक पोलादी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात. त्यानी अवलंबिलेली राजकीय शैली ‘थॅचरिझम’ या नावाने संबोधिली जाते.त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातच फॉकलंड बेटांच्या मालकीवरून ब्रिटन व अर्जेंटिना यांच्यात युद्ध झाले होते. सरकारी मालकीच्या अनेक उद्योगांचे त्यांच्या काळात खासगीकरण झाले.
मार्गारेट थॅचर यांचे ८ एप्रिल २०१३ रोजी निधन झाले.
Leave a Reply