विवाह हा विषय व्यक्तिगत असला तरीही…
– अनेक समूह दुसऱ्या समूहाला संपवण्याच्या इच्छेने त्या समूहातील मुलींशी विवाह करण्याचे उद्दिष्ट ठेवतात. मोठ्यामोठ्या नेत्यांनी त्यांना ही शिकवण दिली आहे, त्यामुळे एक सामाजिक कार्य म्हणून लोक टार्गेट समूहातील मुलींना आकर्षित करण्यासाठी एकमेकांना मदत करतात.
– अशा रीतीने फसलेल्या मुलींनाही आपण काहीतरी मोठे सामाजिक वगैरे कार्य करतो आहोत अशी समजूत करून दिली जाते, किंवा
– प्रेमाला जात धर्म नसतो, प्रेम पवित्र असते वगैरे फिल्मी गोष्टींनी भारून टाकले जाते.
– कशाही प्रकारे ओळख वाढवून शारीरिक संबंध आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतो, पहिल्या संबंधानंतर उद्भवणाऱ्या ऑक्सिटोसिन या हार्मोनमुळे मुलींमध्ये मोठे मानसिक बदल घडतात, आणि ती साधारण वर्षभरासाठी प्रेमात अक्षरश: वेडी होते. तोवर विवाह – प्रेग्नन्सी – अपत्यजन्म झाला असेल तर पुढे जन्मभरासाठी तुरूंगवास वाटला तरी निभावावा लागतो.
– प्रत्यक्षात दुसऱ्या टोळीच्या माद्या पळवणे, दुसऱ्या टोळीची नर पिले मारून टाकणे ही समूहाने राहणाऱ्या जंगली प्राण्यांमधून माणसामध्ये आलेली नैसर्गिक उर्मी आहे. त्यात स्वार्थ आहे, वासना आहे. काहीही उदात्त किंवा सामाजिक वगैरे नाही.
– म्हणजे मुलींकडे शिकार म्हणून पहिले जाते, तसा उल्लेखही त्यांच्या अपरोक्ष होतो.
– त्याच्याही पुढे जाऊन, असा विवाह झाल्यावर मुलीच्या बापाकडे मालमत्तेतील मुलीच्या वाट्याची मागणी करून तिचे संपूर्ण सासर राहत्या घरावर कब्जा करते अशी उदाहरणेही घडलेली आहेत.
त्यामुळे हा विषय व्यक्तिगत असला तरी त्याला सामाजिक रूप आहे. डोळेझाक करून चालणारा नाही.
— श्रीकांत बर्वे
Leave a Reply