नवीन लेखन...

एकाच कुटुंबातील एकगठ्ठा मते

लोकशाहीतील निवडणूकांमध्ये प्रत्येक मत महत्त्वाचे असते. भारतीय लोकशाहीत एकगठ्ठा मतदान किंवा व्होट बॅंकेची संकल्पना भलतीच लोकप्रिय आहे.

अनेक पक्षांनी आपल्या व्होट बॅंक बनवून ठेवलेल्या आहेत. उमेदवारांनीही आपल्या व्होट बॅंक बनवलेल्या आहेत. या व्होट बॅंकांचे पालनपोषण हे उमेदवारांचे अत्यंत प्रिय असे काम. या पालनपोषणातूनच एकगठ्ठा मतदान होतं.

एकगठ्ठा मतदान म्हणजे विशिष्ठ जाती, समुदाय किंवा कोणतातरी समान धागा असलेल्या लोकांना एक आश्वासन देऊन त्यांची सर्वांची मते आपल्यालाच पडतील, अशी व्यवस्था करणे.

एखाद्या कुटुंबाकडून एकगठ्ठा मतदान केल्याचे कधी ऐकलेय? आजकालच्या `हम दो हमारा एक’ आणि एकत्र कुटुंबपद्धत मोडून गेलेल्या दिवसात एकाच कुटुंबाकडून फारतर किती मतांची अपेक्षा करणार? पाच-दहा-पंधरा यापेक्षा जास्त नक्कीच नाही. पण बिहारच्या किशनगंज मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणूकीत एक वेगळ्याच प्रकारचं एकगठ्ठा मतदान झालं. हे एकगठ्ठा मतदान होतं ते एकाच कुटुंबाचे.

या कुटुंबात ८५ लोक आहेत आणि ते एकाच घरात, एकाच छताखाली राहतात. या एकाच कुटुंबाला पटवले तर या मतदारसंघातील कोणत्याही उमेदवाराला एकगठ्ठा ४७ मते मिळू शकतात. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी या घराचा उंबरठा झिजवला.

हे एक मुस्लिम कुटुंब आहे. त्याचे प्रमुख आहेत मोहमंद नजीर. या कुटुंबात ३० स्त्रिया आणि ५५ पुरुष आहेत. त्यातले ३५ लहान मुले, मुली आहेत. येत्या काही काळात या ३५ मुलामुलींमधले काही जण या मतदार यादीत सामील होतील आणि मग या कुटुंबातील मतदारांची संख्या आणखी वाढेल.

नजीरभाईंचे भाऊ मोहमंद अशफाफ यांची पत्नी अंजिरा खातून या तेव्हा गावच्या सरपंच जोत्या. पण घरातले सर्व निर्णय नजीरभाईच घेत. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत कोणाला मतदान करायचे याचा निर्णय त्यांनीच विचार करुन घेतला असणार. ते सांगतील त्यालाच या कुटुंबातील सर्व लोकांनी मतदानही केलं असणार हे उघड आहे.

या गावात नजीरभाईंचे कुटुंब तसे प्रतिष्ठीत आहे. गावातील अनेक समस्या, तंटे, वादविवाद सोडवण्यासाठी हे कुटुंब पोलिसांना मदत करते असे पोलिसही मान्य करतात.

हे गाव बिहारची राजधानी पाटण्यापासून ३५० किलोमीटर दूर आहे. हे गाव पुर्णिया जिल्हयात असले तरी ते लोकसभेच्या किशनगंज मतदारसंघात मोडते. मतदारसंघाच्या सीमांची फेरआखणी झाल्यानंतर ते किशनगंज मतदारसंघात गेले आहे. या गावात बहुसंख्य मतदार हे मुस्लिमच आहेत व त्यांचे प्रमाण ६६.७ टक्के आहे. त्यामुळे केवळ नजीरभाईंच्या कुटुंबातूनच नव्हे तर संपूर्ण गावातून एकगठ्ठा मते मिळतील का याची चाचपणीही काही उमेदवारांनी केली. या एकगठ्ठा मतदानामुळे या गावाची, तसेच नजीरभाईंच्या कुटुंबाच्या मागण्या मान्य करुन घेण्याची क्षमता मात्र बरीच वाढली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..