त्याने किंवा तिने सांगितले
कपडे शिवताना चार मास्क पण शिवा
शिंपी म्हणाला ते तर आम्ही देतोच ?
मला त्या कपडे शिवून घेणाऱ्याची कीव आली.
खरे तर योग्य ती काळजी परखडपणे घेतली पाहिजे.
मास्क घालणे ही नियतीने आपल्याला मजबूर केले आहे, इतके तरी समजून घ्या
गुलामीचा, असाह्यतेचा देखील उत्सव ?
आज आपण आपल्या वृत्ती भयानक वळणावर नेऊन ठेवल्या आहेत.
कुणाला विचारले , ‘ कसे आहात ‘
उत्तर येते , ‘ मजेत ‘
मास्कआडून बोलतो
तेव्हा माणूस सहनशील मजबूर आहे
हे समजले…आणि हसू येते
जणू काहीच चिंता नाही
सर्व काही आलबेल,
विचारले तर म्हणतो
पॉझिटीव्ह रहावे ?
त्याच्या या पण ‘ मॅचिंग ‘ चे ….
कौतुक ? वाटते..
— सतीश चाफेकर.
Leave a Reply