कधी कधी मती गुंग होते
माणुस कधी कळत नाही
भेटीसाठी कुणी उताविळ
तर कुणी, बोलतही नाही….।
बंद दरवाजे, बंद खिडक्या
कोण शेजारी कळत नाही
मी आणि फक्त कुटुंब माझे
संसारी दुसरे कुणीच नाही….।
संवादही सारे खूंटले आता
प्रेमवात्सल्यही जगले नाही
व्यवहारी, जग हे झाले सारे
कुणा कुणाची फिकिर नाही….।
सुसंस्काराची सुकली माती
ओल, कुठेच झिरपत नाही
तोंड देखले, हास्यही छद्मि
नातीच कुठली उरली नाही….।
रुक्ष मनांतर, रुक्ष जिव्हाळा
सहृदयतेचा अंकुर कुठे नाही
समान शीले, समान व्यसनं
याविण मैत्र दूजे उरले नाही….।
शब्द एकची जीवास पुरेसा
तोची या युगी लाभत नाही
कातरवेळी, व्याकुळ स्पंदने
समाधान कुठे जाणवत नाही….।
–वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र. २३३
१३/९/२०२२
Leave a Reply