नवीन लेखन...

मैत्र जीवाचे

मित्रभाव ही माणसामाणसांमधली सर्वात सुंदर भावना आहे… आपुलकी, विश्वास, प्रेम आणि सुरक्षितता जागवणारी…

सर्वांनाच कधी न कधी एकटेपणा जाणवतो. आणि प्रसिद्ध लोकही यातून सूटलेले नाहीत. त्यांच्या अवतीभोवती सतत लोक असतात पण ते त्यांचे खरे मित्र नसतात. यामुळं त्यांना एकटेपणा जाणवतो. तेव्हा, एखाद्याला बरेच मित्र असतील पण त्यांच्यात जर जिव्हाळ्याची मैत्री नसली तर मित्रांच्या घोळक्यातही तो एकटा असू शकतो. आपल्या आनंदात सहभागी होतील आणि खडतर प्रसंगात आपली साथ देतील असे मित्र असणं फार गरजेचं आहे. आपण निराश होतो तेव्हा कोणाकडे तरी मन मोकळं करावंस आपल्या प्रत्येकालाच वाटतं. अशा वेळी आपले मित्र-मैत्रिणीच आपल्या भावना समजू शकतात आणि आपल्याला धीर देऊ शकतात. सुखाच्या क्षणीच नाही, तर कठीण प्रसंगांतही ते आपली साथ सोडत नाहीत.
 
तंत्रज्ञानामुळे अनेकांशी संपर्क साधणं आज पूर्वीपेक्षा खूपच सोईस्कर बनलं आहे. आणि त्यामुळे इतरांशी मैत्री करणं खूप सोपं झालं आहे. पण आजकाल विशेषतः तरुणांच्या बाबतीत.. इतरांसोबत जोडलेल्या या नातेसंबंधात, मैत्रीत नेहमी एक प्रकारचा पोकळपणा, ठिसूळपणा जाणवतो; पण हेच त्यांच्या ‘बाबांच्या’ बाबतीत नाही… कारण त्यांचे अनेक असे मित्र आहेत, ज्यांच्यासोबत त्यांची वर्षांनुवर्षांपासून मैत्री आहे.
 
मग कायम टिकणारी आणि अर्थपूर्ण मैत्री विकसित करणं आज इतकं कठीण का झालं आहे..?
 
तंत्रज्ञान याला काही प्रमाणात जबाबदार असू शकतं. आज प्रत्यक्ष भेटून एकमेकांसोबत बोलण्याऐवजी मेसेजेस, चॅट आणि इतर सोशल मिडियासारख्या माध्यमांचा वापर करण्याकडे लोकांचा कल जास्त असल्याचं दिसून येतं. विद्यार्थीदेखील एकमेकांसोबत वेळ घालवण्याऐवजी मोबाईल किंवा कंप्युटरसमोर तास न्‌ तास वेळ घालवतात.
 
मग मेसेज आणि सोशल मिडियाद्वारे मित्रांच्या संपर्कात राहून मैत्री घनिष्ठ करणं शक्य नाही असा याचा अर्थ होतो का..? नक्कीच नाही. या गोष्टी मैत्रीला हातभार लावतातच, पण सोशल मिडिया बऱ्याच वेळा दोन व्यक्तींमध्ये संपर्क साधण्याचं केवळ एक माध्यम असतं. त्यामुळे मैत्री घनिष्ठ होत नाही.
 
जास्त मित्र-मैत्रिणी नकोत, पण जे आहेत ते मला एक चांगली व्यक्ती बनण्यास मदत करतील अशी असावीत. वयानं मोठं असलेल्या लोकांसोबत मैत्री करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या गोष्टीकडं पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन, त्यांची शांत वृत्ती आणि समजूतदारपणा यांची मनापासून कदर करा. लोकांना प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न करा. प्रत्यक्ष भेटून बोलल्यामुळे जे साध्य होतं, ते इतर कोणत्याही मार्गांनी होत नाही. खरी मैत्री टिकवून ठेवण्यासाठी फक्त संपर्कात असणंच पुरेसं नाही; तर त्यासाठी तुम्ही आणि तुमच्या मित्रांना प्रेम, समजंसपणा, धीर आणि क्षमाशीलता यांसारखे गुण दाखवले पाहिजेत. या गुणांमुळे तुम्हाला तुमच्या मैत्रीतलं नातं आणखी घट्ट करता येईल. फक्त ऑनलाईन चॅट केल्यामुळे असे गुण दाखवणं शक्य नाही.
 
कधीकधी एकटं राहिल्यानं फायदे होतात. एकटं असल्यानं दुःखी होण्यापेक्षा तुम्हाला देवाकडून मिळालेल्या चांगल्या गोष्टींवर विचार करण्यासाठी त्या शांत वेळेचा उपयोग करा. यामुळं इतरजण तुमच्याकडं आकर्षित होतील आणि त्यांना तुमची मैत्री हवीहवीशी वाटू लागेल………
 
मैत्री ही शिदोरी आपुल्या साठीच असते,
ओळखावे खरे मित्र ही एक कसोटीच असते……
 

Avatar
About Shyam Thackare 17 Articles
एक वाचक, एक श्रोता आणि रोजच्या जीवनातून जे अनुभव गाठीशी येतील ते अलगद कागदावर उमटवणारा मी...आणि काही आठवणी, काही अनुभव, काही मतं… लेखणीद्वारे मांडण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न…!
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..