मातृभूचा मी सेवक,
देशसेवा करत रक्षक,
सीमेवरचा मी जवान ,
तिच्यासाठी देतो पंचप्राण,–!!!
मातृभूचा मी सेवक,
एक सामान्यच शिक्षक,
घडवेन उत्तम नागरिक,
निष्ठेने पिढ्या जोपासेन,–!!!
मातृभूचा मी सेवक,
अभियंता म्हणून काम,
जीव ओतून घडवेन,
पुरते जाणून तंत्रज्ञान, –!!!
मातृभूचा मी सेवक,
धन्वंतरी असे नाव,
लेकरांना सांभाळेन,
मार्गदर्शन आरोग्यवर्धक,–!!!
मातृभूचा मी सेवक,
शेत पिकवणारा काटक,
लेकरांना पुरवेन अन्न ,
जाणून आपले कर्तव्यकर्म,–!!! मातृभूचा मी सेवक,
मला म्हणतात मजूर,
मी एक तिचा श्रमिक,
श्रमांवर वैभव उभारेन,–!!!
मातृभूचा मी सेवक,
आहे एक संशोधक,
विज्ञानाची सेवा करत,
नाव तिचे मोठे करेन, –!!!
मातृभूचा मी सेवक,
मला म्हणतात व्यावसायिक,
पाहेन तिची भरभराट,
पोचेन जगाच्या नकाशावर,–!!!
मातृभूचा मी सेवक,
एक विमानचालक,
तिच्यासाठी आभाळा भिडेंन
नाव तिचे दूर दूर पोहोचवेन,–!!!
मातृभूचा मी सेवक,
आहे एक साहित्यिक,
लेखण्यांच्या माध्यमातून,
तिचा लौकिक वाढवेन,–!!!
मातृभूचा मी सेवक,
आहे मी कलाकार ,
आपली कला करून जिवंत,
तिच्या चरणी अर्पेन,–!!!
मी मातृभूची सेविका,
स्त्री असो अथवा बालिका,
तिच्या कुशीतून वर येऊन आभाळाचा ठांव घेईन-!
मातृभूचा मी सेवक,
आहे प्रगाढ पंडित,
धर्म संस्कृती जोपासत,
करेन त्यांचे संरक्षण,—!!!!
हिमगौरी कर्वे©
Leave a Reply