मातृभूमीच्या शूर जवाना
स्वातंत्र्या आधी आणि नंतर
आमच्यासाठी किती खस्ता खाल्यास
याचा इतिहास विसरलो नाही आम्हीं !
मातृभूमीच्या शूर जवाना आप्तांसाठी
ऊन, पाऊस, बर्फाच्या वादळात
सीमारेषेचे डोळ्यात तेल घालून
चोवीस तास राक्षण करतोस !
शत्रूने केलेल्या मातृभूमीवरील भेकड हल्याचे
सर्जिकल स्ट्राईकने चोख उत्तर देतोस
आपल्या आप्तांचे रक्षणकरण्या
वीर मरण पतकरतोस !
मातृभूमीच्या शूर जवाना
तुझा जागता पाहारा आहे सीमेवर
म्हणून दैनंदिन व्यवहार सुरळीत होतात
आणि रात्री आप्त निश्चिंत झोपतात !
मातृभूमीच्या शूर जवाना
उत्सव आणि सणवाराला कुटुंबियांसमवेत नसतोस,
कारण तू सीमेवर मातृभूमीच्या रक्षणाचे
कर्तव्य पार पाडत असतोस !
मातृभूमीच्या शूर जवाना
आम्हीं काय करावे अशी तुझी अपेक्षा आहे?
मातृभूमीचा शूर जवान म्हणतो
करण्यासारखे बरेच आहे !
आपल्या आजूबाजूला काही
संशयास्पद वाटले तर
कायदा हातात न घेता
पोलिसांना कळवा !
मेल, फेसबुक, ट्वीटर, वॅाटसप
सोशल मिडियाचा वापर करण्यास शिका,
पण त्याचा गैरवापर होणार नाही
याकडेही लक्ष असू द्या !
डिझास्टर मॅनेजमेंटचे शिक्षण घ्या,
आपल्या बहादूर जवानांवर विश्वास ठेवा,
वीरमरण आलेल्या जवानांच्या
कुटुंबियांना आधार द्या !
देशाच्या अखंडतेला कुठे तडा जाईल
असे एकमेकांशी वागू नका
युद्ध प्रसंगी अफवा पसरवू नका
अफवांवर विश्वास ठेऊ नका !
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply