आई होऊन कळले मजला,
कष्ट आईचे आज खरे ।
स्वानुभवे जे जाणूनी घेई,
तुलना त्याची कोण करे ।।१।।
नऊमास तू जपला उदरी,
क्षणाक्षणाला देऊनी शक्ती ।
बाह्य जगातून शोषून सारे,
सत्व निवडूनी गर्भा देती ।।२।।
देहावरी आघात पडता,
झेलूनी घेई सारे कांहीं ।
बाळ जीवाला बसे न धोका,
हीच काळजी सदैव राही ।।३।।
संगोपन करीता करीता,
हासत होती अर्धपोटी तू ।
सुखी ठेवण्या सोशीली दु:खे,
कधी न कळला उद्दात हेतू ।।४।।
कसे फेडू मी ऋण मातेचे,
पेटविली ज्योत जिने ।
अर्पियले जरी जीवन सारे,
ऋण तिचे न फिटे ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
लेखकाचे नाव :
डॉ. भगवान नागापूरकर
लेखकाचा ई-मेल :
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply