भावमनीचे उमटूनी पडती ज्याचे सहवासे
काव्यामधला ईश्वर मजला तोच परि भासे
शब्द तयाचे ऐकत असता मन येते भरूनी
शब्दांना त्या बांध घालता काव्य पडे उमटूनी
अनूभव ज्याचा वदला जातो कंठा मधूनी
भोगलेला असे परि तो एके काळी त्यांनी
सत्य सारे तेथे असता दिव्यत्वाची जाण
म्हणूनच पटते मनास तेंव्हां हेच खरे जीवन
वाचित गेलो धर्मामधूनी जे जे सारे काही
शिक्षीत नसूनी स्वानूभवे तेच व्यक्त होई
हेच भासले काव्य मजला साऱ्या जीवनाचे
उतरत होते लेखणीतूनी बोल अनूभवाचे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply