व्यथा साऱ्याच अंतरीच्या
मौन तुझे गं, सांगुनी जाते
कोण, कुणाचा गं अपराधी
नकळत सारे उमजूनी जाते ।।१।।
वैगुण्य ते प्रीतीमध्ये कुठले
निष्पाप भावनां समर्पणाची
मन्मनी, प्रीती विरघळलेली
सत्य अलगदी ओघळुनी येते ।।२।।
काय लाभले काय हरविले
मनांतरीचे गूढ हितगुज सारे
जळात, जरी प्रहार लाठीचे
काय जलधारा दुभंगुनी जाते ।।३।।
सारीपाट, साराच प्रारब्धाचा
हसत, हसतची सहज रमावे.
आठवांचे ते आभाळ रेशमी
मिटूनीया लोचने कवेत घ्यावे ।।४।।
©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १०५.
१० – ८ – २०२१.
Leave a Reply