मौनातील काजळ वेदना
निःशब्द हृदयात सलते
अनेक दुःखाचे पड आयुष्यात
भोग भोगूनी रडवुनी जाते..
सहज साधे काहीच कधी नसते
आयुष्य कळसूत्री बाहुली असते,
मन रडते उन्मळून आवेगात
जीवन ही काटेरी झाडं बनते..
आयुष्य ही टोकास सहज जाते
नशीब जेव्हा वाईट असते,
कधीच सुखद झुळूक नसते
तप्त बोलांचे घाव जिव्हारी उठते..
नशिबाच्या ललाटी खेळ रंगतो
आयुष्य उध्वस्त एकाकी होते,
दुःखाचा थेंबही अनामिक तेव्हा
मनातील दुःख रडवून आल्हाद जाते..
सहज वाटल्या वाटा सरळ साऱ्या
तरी वाकड्या होतं आयुष्य मिटते,
नशीब असेल वाईट दुःखद अंतरी
निःशब्द वेदना जिव्हारी डसते..
उत्तरायण सुरु होता मग
नजर पैलतीरी आल्हाद लागते,
मरणं असेल सुटका सारी अंतिम
मग पैलडोह वाट नजर पाहते..
आयुष्यातील संचित भोग
न कधी कुणाला सुटणारे,
आनंद डोह पार पैलतीर जावा
बोलावणे हसत डोळ्यांत जमावे..
पैलतीरी डोळे व्याकुळ भाव नजर
दुःख न कळणारे आयुष्य व्यापते,
सजेल यात्रा अंतिम इहलोकी
आनंद क्षण ते एकाकी मन रडावे..
अस्तास जातो सूर्य सांज वेळी
काळोख नभांगणी अवचित दाटतो,
दुःख येतात जीवन भरुन अबोल असे
पैलतीरी जीवन नौका जाता क्षोभ क्षुब्ध होतो..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply