८८ वर्षापूर्वी १६ मे रोजी पहिला ऑस्कर पुरस्कार दिला गेला. कलाविश्व आणि चित्रपट दुनियेमध्ये मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते. ऑस्करची ती सोनेरी बाहुली आपल्याला मिळावी याकरता प्रत्येक कलाकार प्रयत्नशील असतो. चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञांपासून ते कलाकारांपर्यंत ऑस्कर मिळवण्याकरता चढाओढ लागलेली असते.
१६ मे १९२९ रोजी ऑस्कर पुरस्कार म्हाणजेच अकॅडमी पुरस्कार हे हॉलिवूडच्या अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्डर या सायन्स चलचित्र या संस्थेतर्फे चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला. याच पारितोषिकांना पुढे ’ऑस्कर’ असे नाव पडले.
अमेरिकेतील हॉलिवुड रुझवेल्ट हॉटेलमध्ये पार पडलेल्याच पहिल्याप पुरस्का्र सोहळ्याला असे झाले नव्हसते. त्याुवेळी या सोहळ्याला केवळ २७० व्य्क्तीरच उपस्थिहत होत्या,. या सोहळ्याला पाच डॉलर तिकिटाचा दर होता. त्याुवेळी अमेरिका, यूरोपच्या् वृत्तीपत्रांतून त्यालला अपेक्षित अशी प्रसिद्धीसुद्धा दिली गेली नव्ह ती. मेट्रो-गोल्डिन-मेयर स्टुडिओचे लुईस बी. मेयर यांनी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स अकादमीची स्थापना केली. तेच या पुरस्कायराचे संस्थाीपक आहेत. पहिल्या सोहळ्यात ऑस्कर विजेत्यांची नावे सोहळ्याच्या तीन महिने आधीच जाहीर केली गेली होती. पहिल्या सोहळ्यात १५ ऑस्कर पुरस्कार दिले गेले होते.
सवोकृष्ट अभिनेत्याचे पहिले ऑस्कर एमिल जॅनिंग्ज यांना, तर सवोकृष्ट अभिनेत्रीचे पहिले ऑस्कर जेनेट गेनर यांना मिळाले दिले गेले होते. यात दोन विशेष ऑस्कर पुरस्कार दिले गेले. वॉर्नर ब्रदर्स यांना जॅझ सिंगर चित्रपटाची निमिर्तीसाठी चार्ल्स चॅप्लिन यांना दी सर्कस चित्रपटाचे निर्माता लेखक आणि अभिनेते यासाठी हा पुरस्कातर दिला गेला होता. मात्र, पुढील वर्षापासून विजेत्यांची नावे पुरस्कार सोहळ्यापर्यंत गुप्त ठेवण्यात येऊ लागली. सोहळ्याच्या आधीच विजेत्यांची यादी वर्तमानपत्रांकडे पाठवली जायची आणि सोहळ्याच्या दिवशी रात्री ११ वाजता ती वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध करायची, असे ठरवण्यात आले. ही पद्धत १९४० पर्यंत पाळली गेली. परंतु, लॉस एंजेलिस टाइम्सने ऑस्कर विजेत्यांची यादी सायंकाळीच प्रसिद्ध केली. त्यामुळे सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या सर्वांना ती सहज उपलब्ध झाली. या मुळे पद्धत बदलणे भाग झाले.
१९४१ पासून बंद पाकिटात विजेत्यांची नावे देण्याची पद्धत सुरू झाली. १९५३ मध्ये ऑस्कर सोहळा प्रथमच टीव्हीच्या माध्यमातून अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि कॅनडा पर्यंत दाखवला गेला. १९६९ पासून ऑस्कर सोहळा जगभर प्रक्षेपित केला जाऊ लागला. सध्या हा सोहळा २०० पेक्षा अधिक देशात पाहता येतो. या पुरस्कारर सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असते. जवळपास जगातील सर्वच प्रमुख वृत्तयवाहिन्याा, वर्तमानपत्रे त्याोला ठळक प्रसिद्धी देतात. याच सिनेजगतातील सर्वोच्चप मानला जाणारा ऑस्कयर पुरस्कापर तर सर्वांच्याठच आक र्षण, उत्सुीकतेचा विषय. मराठी, हिंदी, तमीळ आणि बंगाली; तसेच देशातील इतर भाषांतील सर्वोत्कृष्ट ३५ चित्रपटांमधून एका चित्रपटाची अधिकृत निवड केली जाते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply