मयुरा तूं आहेस गुरु, तुला आम्हीं वंदन करु ।।धृ।।
नदी कांठच्या वनीं
थुई थुई नाचूनी
पिसारा फुलवुनी
तुझे पाहूनी नृत्य, नाचाचे ताल धरु ।।१।।
मयुरा तूं आहेस गुरु तुला आम्हीं वंदन करु
मोरपिसे सुंदर
रंग बहारदार
दिसे चमकदार
बघुनी रंगाची विविधता, कुंचल्यांनी सप्तरंगी छटा भरुं ।।२।।
मयुरा तूं आहेस गुरु तुला आम्हीं वंदन करु
रुप डौलदार
चाल ऐटदार
भासे रुबाबदार
बघुनी तुझा आनंद, सुखी जीवनाची कला अंगीकारुं ।।३।।
मयुरा तूं आहेस गुरु तुला आम्हीं वंदन करु
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply