माझा मित्र सतीश भिडे हे काम खंडपणे आणि प्रामाणिपणे करत आहे हे पाहून खरेच कौतुक वाटते, तो अत्यंत वेगळ्या पद्धतीने विचार करतो हे अत्यंत महत्वाचे आहे.
अखंड भारताच्या घोषणांनी मसुरी, नैनितालची थंडी गायब. देशातील अब्दुल -नारायण – डिसुझा हाच भारताचा मालक असून, खरा धर्म हा केवळ राष्ट्रधर्म आहे असे कळकळीचे आवाहन वीर सावरकर चरित्र गायक सतीश भिडे ह्यांनी नुकतेच मसुरी, नैनिताल येथे केले.
वीर सावरकर ह्यांचे जीवनावरील कार्यक्रम मसुरी – नैनिताल येथे सादरकरतेवेळी भिडे ह्यांनी देशाचा खरा शत्रू जातीयता -अंधश्रद्धा असून तो नष्टकरण्याचे आवाहन केले. कार्यक्रमांस साथसंगत मिलिंद कारखानीस ह्यांची लाभली होती. सामाजिक अंतर राखत सादर झालेल्या कार्यक्रमांस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आलेली जाणकार मंडळी उपस्थित होती. जेष्ठ सामाजिक नेते श्री चंदन सुयल कार्यक्रमास उपस्थित होते. श्री भिडे ह्यांनी आजपर्यंत मानधन न घेता भारतात व परदेशात सादर केले असून एकूण 2789 कार्यक्रम सादर केले आहेत. सतीश भिडे हे गिरगाव येथे रहातात.
सतीश चाफेकर.
Leave a Reply