नवीन लेखन...

माझी जबाबदारी

जळी स्थळी एकच नारा. मुखपट्टी. (मास्क) अंतर आणि हात धुणे. कोरोनाने याचा खूपच उदोउदो केला आहे. माहिती नाही हे सगळे अजून किती दिवस चालणार आहे पण या त्रिसूत्री जबाबदारीने आणखीन काही गोष्टी शिकवल्या आहेत. बघा पटतंय का ते.
१)मुखपट्टी….
नाकावर नीट बसवावी लागते. नाहीतर जंतूंचा संसर्ग होऊ शकतो. नाकाला अनेक चांगल्या वासाची सवय असते. त्यामुळे वय आणि आजार यामुळे काही पदार्थ वर्ज्य असतात. नाकावर पट्टी असेल तर. जिभेवर ताबा राहील. नाक मुरडलेले दिसत नाही. नाकावर टिच्चून काही करत येत नाही. नथीचा नखरा मिरवता येत नाही. नाक खुपसायची खोड जिरते. नाकाने कांदे सोलता येत नाहीत. नाकावरचा राग दिसत नाही म्हणून आपले लाड होणार नाहीत नाकाला मिरच्या झोंबल्या तरी चालेल पण अन्याय सहन करायचा नाही. आणि ती पट्टी व्यवस्थित बसण्याची सोय कान करतात. तेव्हा कानाने ऐकले ते खरे असतेच असे नाही. आणि हो मुखपट्टी बांधली तरी मुखदुर्बळ व्हायचे नाही. कुणी त्रास देत असेल तर खुषाल मुंहतोड जवाब द्यायला हवे तसेच तोंड भरून कौतुकही करायला हरकत नाही.. आणि अजून एक म्हणजे कवळी दिसणार नाही. दात विचकलेले दिसणार नाहीत. हसले तरी दात दिसणार नाहीत. मज्जाच मज्जा..
२)अंतर….
अंतर ठराविक असणे अत्यंत आवश्यक आहे. पण नात्यात अतंर नको यामुळे मर्यादा पाळावी असा संदेश येतो. मिठ्या मारणे. केक तोंडाला फासणे. नको तिथे गर्दीचा फायदा घेऊन धक्का मारणे. हे जरा कमीतरी होईल. . मनातील भावनिक अतंर नको. याचा फायदा अपघातात होईल. त्यामुळे होणारे वाद निर्माण होणार नाहीत. शेजारधर्म यात तर मुळीच नको. अतंर मर्यादा शिकवते. उदा. कार्यालयात साहेब कारण नसताना रागावतात. आणि आपण गप्प बसतो तसेच घरी वडील धारी माणसं रागावतात तेव्हा हीच मर्यादा ठेवावी. एखाद्याने मदत केली. काम केले की लगेच आभार मानतो. पण घरी आभार मानत नाहीत म्हणून फक्त जाणीव ठेवावी. औपचारिकता म्हणून किंवा स्वभाव आहे म्हणून इतरांशी गोड बोलले जाते. आस्थेने चौकशी केली जाते तोच आपलेपणा घरातील लोकांबरोबर ठेवला तर दुराव्यातील अतंर नक्कीच कमी होईल
३)हात धुणे…
ही आपली शिकवण आहेच. हात धुतल्याशिवाय बऱ्याच गोष्टी आपण करत नाही. पण पाणी वाया किती जाते याचे नियोजन केले तर छानच. पण आता अशा वेळी स्वतःचे हात धुवून घेणे महापाप आहे. आधीच महामारी त्यात सतरा कारभारी म्हणून. आपले चारित्र्य धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असावे लागते. सतरावेळा कसलेही साबण लावून हात धुतले तरीही हातावरच्या रेषा धुतल्या जात नाहीत. म्हणजे नशीब बदलून जाणार नाही. हस्तोलंन व हस्तक्षेप केलेले चालणार नाही. त्याचे परिणाम भोगावे लागतील…
आज आपण सगळे घरी दारी एकमेकांपासून लांब अंतरावर आहोत पण मनाने जवळ आहोत. रोज भेटतो. विचारपूस करतो. एकमेकांना धीर देतो. इथे मात्र कसलीही अपेक्षा नाही. त्यामुळे कसूर नको. आणि वरील त्रिसूत्री बंधन आपल्या वर नाही हे भाग्यच आहे ना? मग काय मंडळी पटलयं ना. नाही पटले तर जास्त विचार करू नका. आणि आपली जबाबदारी ओळखून हे सगळे नियम मात्र जरूर पाळले पाहिजेत.
— सौ कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..