नवीन लेखन...

माझी रीमाताई

Mazi Reematai

ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांचा  रीमा लागू यांच्याबद्दलचा हा लेख


२००० ची गोष्ट चिंतामणी नाट्यकंपनी तर्फे नथुराम फेम लेखक प्रदिप दळवी यांचे ” झाले मोकळे आभाळ” हे नाटक रंगमंचावर येणार होते. त्यात मला घ्यायचा आग्रह प्रदिपजींनी केला .दिग्दर्शक होते राजन ताम्हाणे. त्यात मी काम केलं व ९ वर्ष रंगभुमीपासुन लांब राहिलेल्या रीमा पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर पदार्पण करणार होत्या.

अर्थातच हिंदी चित्रपट सृष्टीत एवढ मोठ नाव कमावलेली हिंदीतल ग्लॅमर असलेली अशा अभिनेत्री बरोबर काम करण्याचा योग आला. मनात ती कशी असेल वगैरे कल्पना येत होत्या. पण ती आली तिने पाहिलं व ति जिंकली अस काहीतरी घडल व पहिल्या दिवसापासूनच आमचं ट्युनिंग जमलं ते आज म्हणजे शेवटपर्यंत. मग तालमी दौरे. आम्ही दोघं एकत्र फिरायचो. त्याचवेळी महेश मांजरेकरांचा वास्तव सिनेमा प्रदर्शित होणार होता. आमचा दौरा नागपूरला व तिथेच वास्तवचा प्रिमीयर. निघायच्या दिवशी फोन करुन म्हणाली. ए नागपूरला तुला प्रिमीयरला घेऊन जाणारे….  चांगले कपडे सोबत घेऊन ये. मग नागपूरला जिथे जाऊ तिथे सोबत घेऊन जायची. प्रिमीयरला सगळ्यांशी ओळख करुन दिली.

पुण्यात एकदा सिनेमा बघायचा मुड आला. मग आम्ही दोघं रीक्षेतुन थिएटरला गेलो. रीक्षेत रीमाताई बसली. मी ऊतरुन मॅनेजरला भेटलो. मग सर्व प्रेक्षक आत सोडल्यावर हिला मी घेऊन गेलो. मध्यंतर व्हायच्या आत मॅनेजरच्या केबिन मधे. परत सिनेमा सुरु झाल्यावर थिएटरमध्ये परत संपायच्या आंत रीक्षेत व हॉटेलवर. त्यामुळे ति व मी एकत्र ४ सिनेमे पाहिले. त्यांची सुरवात व शेवट व मध्यंतर नेमकं काय घडल ते कळलच नाही.

एकदा मी खादी चा झब्बा घालुन गेलो तर तिला तो आवडला व मी तो दिला तर आनंदाने तिन तो वापरला. आपण कोण शरद एक छोटा नट असला भेदभाव तिच्या मनाला कधी शिवलासुध्दा नाही. एकदा मी चिंतेत होतो. जवळ येऊन म्हणाली की काय झाल बाळा? मी म्हटल भाईंदरला राहतो बोरीवलीत म्हाडाचं घर घ्यायला पैसे नाहित. बँक लोन देत नाही.

२००० साली २५० स्क्वेअर फुटाच घर ३ लाखात मिळत होतं. रोज लोकलनी यायला त्रास होतो. बर म्हणाली होईल काहीतरी. ५ दिवसानंतर अचानक अंधेरीच्या घरी बोलावून घेतलं व हातात ३ लाख रुपये ठेवले व म्हणाली जा पहिल्यांदा ते घर घे बोरीवलीत रहायला ये. रडायला आलं मला. चिठ्ठी चपाटी, कागदपत्र. काहीही नाही. जमेल तसे परत दे. तिच्या सीएंनी सांगीतलं ओरडले. म्हणाले आधी ईतक्या लोकांना दिलेत ते परत आलेलेच नाहीत. आता चक्क ३ लाख? तर म्हणाली शरद नाही फसवणार. केवढा विश्वास? मिही तो सार्थ ठरवला. सगळे पैसे फेडले. शेवटचा हप्ता घेऊन शिवाजीला प्रयोगाला गेलो. सोबत काळी साडी नेली. तर काय खुष झाली. तिला काळी साडी खुप आवडायची व दिसायचीही सुंदर.

तर अस हे नात जपाव लागल नाही. आपोआप वृंध्दिगत होत गेलं. घट्ट होत गेलं. ती खरी ताई झाली. त्याच अधिकारा नि बोलायची. माझी भाषण लेख ऐकुन तीला काळजी वाटायची कायम. माझ्या व्यक्तीगत समस्या तिच्या वैयक्तिक समस्या एकमेकांबरोबर वाटायचो. अश्विनी गेल्या नंतर रोज अर्धा तास माझ्याशी बोलायची. म्हणायची सकाळी ७.३० वा मी फोन करत जाईन हा.

अशी ही माझी रीमाताई कायमची सोडुन गेली हे पचवायला भयंकर कठीण जाणारे. पण ईश्वरापुढे आपण फक्त कटपुतली आहोत. जगात आणणारा तोच नेणाराही तोच. वेळा ठरलेल्या असतात. त्या कधीच चुकत नाहीत. सहा महिन्यात मृत्युला फारच जवळून पाहिलं अनुभवलं. एकदा अश्विनीच्या वेळी व लगेचच रीमाताई च्या वेळी.

हेच एकमेव सत्य आहे. तुम्हाला जगावच लागत. पर्यायच नाही. अशा ह्या रीमाताईला सद्गति मिळो. तीची मुलगी मृण्मयीला धक्का सहन करण्याचं बळ मिळो हिच बापाकडे प्रार्थना.

— शरद पोंक्षे

— संकलन : अशोक साने
फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी  शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..