माझिया माहेराची नागमोडी वाट
जाई चढत चढत खंडाळा घाट।।धृ।।
निसर्ग कुशीत दडलं माहेर गं
हिरवी हिरवाई सभोवताली गं
तिथे थाटला पोहळी बनाचा थाट
जाते चढत चढत खंडाळा घाट।।१।।
माझे माहेर आहे बाई तालेवार
दिमतीला सदोदित नोकर चार
बंगळीस आहे पहा चांदीचा पाट
जाते चढत चढत खंडाळा घाट।।२।।
माय माऊली माझी
उभी स्वागताला
वहिनीसवे माझा बंधूराया आला
आजी-आजोबा नी भाच्चे बघती वाट
जाते चढत चढत खंडाळा घाट।।३।।
माझ्या माहेरी वाहतो मायेचा झरा
खंबीर बाप साऱ्यांचा पोशिंदा खरा
माय म्हणे सासरी पाठवणी करा
जाते चढत चढत खंडाळा घाट।।४।।
गीतकार
सौ.माणिक शुरजोशी
५/१२/१९
Leave a Reply