मी कोण आहे
मी एक स्त्री आहे
आई-बाबांच्या लाडात वाढलेली
थोडीशी खोडकर थोडीशी हट्टी
मी एक मुलगी आहे
मी एक स्त्री आहे
मातापित्यांच्या सावलीत वाढलेली
चांगले संस्कार घडलेली
थोडीशी अल्लड, थोडीशी बालिश
मी एक कळी आहे
मी एक स्त्री आहे
त्याची ती आहे
होय प्रेयसी आहे
स्वप्नात वावरणारे मी एक परी आहे
मी एक स्त्री आहे
पतीची पत्नी आहे
कर्तव्याची जाण असलेली
मी समजूतदार बाई आहे.
मी एक स्त्री आहे
मुलाबाळांची आई आहे
संस्कृती संस्कार यांची शिकवण देणारी
मी परिपूर्ण माता आहे
मी एक स्त्री आहे
नातवंडांची आजी आहे
मृत्यूचा शोध घेणारी
मी जख्खड म्हातारी आहे
खरं सांगायचं तर मी कोणी नसून
मी एक शून्य आहे
नियतीच मला घडवत आहे
कृती माझ्यात अवतरते आहे
या सर्वांपलीकडचा
मी एक आत्मा आहे
– तृप्ती काळे-भगत
व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार
Leave a Reply