तू माळल्या बकुळीचा गंध
अंतरात दरवळतो अजुनही
आली कित्येक बेधुंद वादळे
स्मरण तुझे अंतरी अजुनही
सारेसारे आजही तसेच आहे
मी न काही भुललो अजुनही
जिथे जिथे जाते नजर माझी
तुझेच ते ध्यासभास अजुनही
तूच रुजलिस अशी हृदयांतरी
स्पंदनी चैतन्य तुझेच अजुनही
********
— वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. ३०३
२४/११/२०२२
Leave a Reply