त्याने तेव्हाही कंबरेवरचे हात काढले नव्हते,
तो आजही कंबरेवरचा हात उगारत नाहीये..
अन् हात जोडणाऱ्यांची गर्दी मात्र दिवसेंदिवस वाढत आहे..
तो तेव्हाही विटेवरून उतरला नव्हता,
तो आजही विटेवरून उतरत नाहीये..
अन् पायी चालून वारी गाजवणाऱ्या भाबड्या मनाचा आकांत मात्र दिवसेंदिवस वाढत आहे..
त्याने तेव्हाही गार्हाणी ऐकली नव्हती
तो आजही गार्हाणी ऐकत नाहीये..
अन् माळकरी टोपीवाल्यांची आषाढी एकादशी मात्र कुठल्याही परिस्थितीत चुकत नाहीये..
तो तेव्हाही म्हणाला होता
तो आजही हेच सांगतोय..
माणसा-माणसांमध्ये मला शोधा
मी तिथेच तुमची वाट पाहतोय…………..
Leave a Reply