नवीन लेखन...

फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राखायचंय ?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) म्हणजेच डब्ल्यू.एच.ओ. नुसार, दरवर्षी जवळपास 3 लाख लोकं श्वसनासंबंधी आजारांनी पीडित होतात , ह्याचे मूळ कारण दूषित हवा आणि धकाधकीचा दिनक्रम असून, असा दिनक्रम तुमच्या फुफ्फुसांना नुकसान पोहोचवत राहतो. त्यामुळे तुम्हाला कालांतराने श्वास घेण्यास त्रास होऊन श्वसनासंदर्भातील विकारही होऊ शकतात. तज्ञांच्या म्हणण्यानुसार , योग्य आहार आणि जीवनशैलीमुळे तुम्हाला फुफ्फुसांचं आरोग्य राखण्यास मदत होऊ शकते.

1. लसूण
लसणामध्ये असलेली महत्वपूर्ण तत्वे आरोग्यासाठी लाभदायक असून यामध्ये अॅन्टीमायक्रोबायल, अॅन्टी-कॅन्सर आणि ब्लड प्रेशर कमी करणारे गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. चीनमधील वैज्ञानिकांना संशोधनादरम्यान असं आढळून आलं की, लसूण फुफ्फुसांचं आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर असून फुफ्फुसांचा कॅन्सर असणाऱ्या व्यक्तींना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो.
2. पालक
पालक व्हिटॅमिन आणि खनिज तत्वांचे मोठे भंडार असून वैज्ञानिकांना असं आढळून आले आहे की, पालकामध्ये असलेले महत्वपूर्ण औषधी घटक आपल्या शरीरातील सूज कमी करण्याचं आणि कॅन्सरशी लढण्यासाठी मदत चांगल्याप्रकारे करतात. दररोज पालक खाल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
3. सफरचंद
सफरचंदामध्ये अॅन्टीऑक्सिडंट आणि फायटोकेमकल्स मुबलक प्रमाणात असल्यामुळे अस्थमा, कॅन्सर, शरीरातील सूज आणि हृदयाचे विकार यांवर सफरचंद अतिशय फायदेशीर ठरते. नाश्त्यामध्ये दररोज एक सफरचंद खाल्याने फुफ्फुसांचे आरोग्य चांगलं राखण्यास खूपच मदत होते.
4. आले
सर्दी आणि गळ्याच्या तक्रारींवर सर्वाधिक उपायकारक ठरणारे आले, फुफ्फुसांचं आरोग्य राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर असून संशोधकांना संशोधनादरम्यान असं आढळलं की, आल्यामुळे अस्थमा, सर्दी, मायग्रेन आणि उच्च रक्तदाब थांबवण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते तसेच दररोज आल्याच पाणी प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे देखील होतात.
5. ब्रोकली
ब्रोकलीमधील औषधी तत्व आरोग्यसाठी खूपच लाभदायी असून वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार, ब्रोकलीमध्ये अॅन्टीऑक्सिडंट आणि अॅन्टी-कॅन्सर गुण मोठ्या प्रमाणात असतात जे फुफ्फुसं, पोट आणि स्तनाच्या कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे दररोज अर्धा कप ब्रोकलीचं सेवन करणं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
6. हळद
हळदीचा उपयोग शरीराच्या विविध व्याधी कमी करण्यासाठी होतो हे आपण सर्वच जाणतो. हळदीमध्ये अॅन्टीऑक्सिडंट, अॅन्टी-कॅन्सर गुणधर्म असतात जे कॅन्सर आणि लठ्ठपणापासून बचाव करण्यासाठी मदत करतात. सकाळच्या वेळी हळदीचा छोटासा तुकडा खाल्याने शरीराच्या अनेक तक्रारी दूर करण्यासाठी ते फायदेशीर ठरतं.
— संकेत रमेश प्रसादे 
Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..