अमेरिकेतील अरीझोना स्टेट मधील फिनिक्स हे सुंदर व प्रशस्त वसलेले शहर. स्वछता शिस्त व नियमांचे काटेकोर पालन ह्याचा अनुभव तीव्रतेने तेथील वास्त्व्यात आला. प्रत्येक संस्थांचे नियम असतात ते सहसा मोडले जात नाहीत. तेथे एक मजेदार अनुभव आला. मुलगा एका कंपनीत कामाला होता. त्याच्याकडे आम्ही दोघे गेलो होतो. त्याची बायको अर्थात माझी सून गर्भवती होती. सात महिने झालेले. त्याच शहरात नजीकच्या मोठ्या रुग्णालयात तिची रीतसर नोंदणी केलेली होती. संबंधित स्त्री डॉक्टर तज्ञाकडून नियमित तपासणी केली जात असे. एक दिवस सुनेच्या पोटात दुखू लागले. आम्ही सर्वजन बेचैन झालो. तिला रुग्णालयात घेऊन जाऊ लागलो. रस्त्यातच त्या स्त्री डॉक्टर तज्ञाची कन्सल्टिंग रूम लागल्यामुळे, मुलाने तातडी म्हणून ( Emergency ) तेथेच तपासण्याकरिता नेण्याचा निर्णय घेतला. स्वागत कक्षात मुलगा Receptionist ला भेटला. आम्ही बाहेरच्या खोलीत बसलो. Reseptionist एक वेगळ्याच विचाराची स्त्री असल्याचे जाणवले. आमची पूर्व भेट वेळ (Appointment) घेतलेली नव्हती. शियाय त्यांच्या पद्धती नुसार जर काही यातना होत असतील तर प्रत्येकाने रुग्णालयाच्या Emergency विभागात रुग्णाला घेऊन जाणे, जेथे तेथील डॉक्टर ती केस प्रथम बघतील, जर गरज पडली तरच तज्ञाला कळवतील. Consulting रूममध्ये असल्या केसेस तपासत नाहीत. आम्ही फार बेचैन झालो. ती आमचा व त्या तज्ञ डॉक्टरांची भेट देण्यास विरोध करीत होती. नियमाच्या चाकोरी मधून तिचे वागणे खरे असले तरी परिस्थिती,आपत्कालची वेळ, आणि माणुसकी याचा विचार ह्याला अनुसरून ते अयोग्य होते. आमच्या आग्रही विचाराना मर्यादा होत्या. शेवटी आम्ही रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply