विषय विचित्र म्हणा , गरजेचं काहीही म्हणा! परंतु आज जगभर या व्यवसायात करोडो डॉलरची उलाढाल होते हे मान्यच करावे लागेल. फार पूर्वी फ्राईड ने संगितले होते २०२१ किंवा त्यानंतरचे शतक मानसोपचार तज्ञांचे असणार आहे . आज ती वस्तूस्थती निर्माण झाली आहे कारण कोरोनाच्या काळात एक तर सवांद तुटलेला आहे आणि काहींच्या डोक्यात पुढे काय ? हा यक्षप्रश्न निर्माण झाला असणारच ह्यात शंका नाही. मी सतत का याचा विचार करतो , माझे मलाच कळत नाही . अनेक वेळा मी चर्च मध्ये जाऊन बसलो आहे ,देवळात अगदी स्मशांनात सुद्धा. एकच विचार मनात आला सर्वप्रथम आपण आपल्याशी सवांद साधून बघू की मला काय आहे आहे आणि काय मिळाले आहे. कधीकधी मानसिक अवस्था नसते हे अगदी मान्य करतो . परंतु मित्र म्हणा किंवा एखादी मत्रीण म्हणा बोलण्यासाठी आपल्याला निश्चित हवी असते, जर मित्र किंवा मैत्रीण माठ असेल , फक्त स्टेटस वगैरे सांभाळणारे असतील तर पंचाईत असते. सर्वप्रथम आपल्याला चर्चा किंवा विचार विनिमय करायला कोणी खरे जवळचे मात्र आहेत का ते तपासून बघितले पाहिजे. हल्ली घरात प्रश्न नसतो कारण एक मुलगा किंवा एक मुलगी. त्यांच्या दृष्टीनी आपण आऊटडेटेड खरेच आहोत का ? त्यांना समजवून घेत आहोत का ? हे पण बघितले पाहिजे. हळू हळू खरे कळू लागते कुणीतरी हवे असते , सवांद असणे गरजेचे असते.पोथ्या पुराणात न रमणारा मी स्वतःचा शोध घेऊ शकतो. मला वाटते स्वतःचा शोध घेणे म्हणे मेडिटेशन आहे का ? तर दुसरीकडे सर्व काही आहे पण मनशांती नाही. जो वरचा वर्ग आहे योग वगैरे करणारा आहे अर्थात त्यात शोमनचा भाग जास्त असणार हे नक्की. सिने कलाकार म्हणा , उद्योगपती म्हणा तेथे खरा मित्र शोधणे कधीकधी कठीण असते.
दुसरीकडे डोक्याला फळकुट ठेवून ढाराढूर झोपणारा एखादा हमाल किंवा कष्टकरी पहिला की खूप हसू येते या वरच्या क्लासचे आणि इथूनच हा व्यवसाय फुलत गेला असे वाटत नाही का. सुरवातीला मानसोपचारतज्ञ त्यांना बघतो मग पुढल्या सिटिंग्स त्याचे असिस्टंट करतात कारण कार्यबाहुल्यामुळे त्यांना वेळे देता येत नाही.खूप गुंतागुंत आहे , सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. मानवी मन हे प्रचंड चंचल आणि वेगवान आहे. मग त्याला स्थिरता कशामुळे येते? याचा आपण विचार केला आहे का ? मी ओशो वाचला , जे कृष्णमूर्ती वाचले ते थिंकर या विचारातून , त्यांचा फॉलोअर कधीच झालो नाही. कधी कधी विचार जुळले पण ते माझ्या मनाच्या संवेदनांशी एकरूप होतात का बघितले आणि माझे काम मी करू लागलो.
इथे मी हा महत्वाचा आहे हे लक्षात घ्या कारण माझे शरीर , माझे मन , माझे विचार हे महत्वाचे वाटतात कारण मी जिवंत आहे आणि ते माझ्याशी माझ्यातल्या मी शी निगडीत आहेत. मेडिटेशन ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे कोणतेही विचार मनात येऊ नये किंवा कोणताही विचार करू नये, एकग्रता करावी. मग संगीत असो किंवा ओंकार असो. त्या वेव्हशी एकरूप होता आले पाहिजे. आज माणूस एकाग्र होत नाही , मग एखादी जाहिरात समोर येते तू योगाच्या क्लासची फी भरलीस का ऑन लाईन , असे एकजण दुसऱ्याला सागतो. मला खरेच हसू येते आज ह्या गोष्टीसाठी पैसे मोजावे लागतात. खरेच दुपारचे जेवण झाले की झोप लागते त्यात सर्व सुख असते ही माझी घरी धारणा.आता ती झोप ते सर्व लुप्त होऊन आपण सतत नको तो विचार करून दुखणी मागे लावून घेतो. स्वतःला का आणि कशाला हा प्रश्न विचारण्याची आम्ही ताकद गमावलेली आहे का? दुसरीकडे अमुक खड्याची अंगठी किंवा tarot कार्ड यांचाही बिझनेस जोरात आहे.
मला आठवतंय, काही वर्षांपूर्वी जामनगरला गेलो होतो. पुढे समुद्रात अनेक ठिकाणी बोटीतून गेलो , त्या बोटीमधील खलाशी काही शिंपले पाण्यातून काढत असत , ते समोर फोडून मोती बाहेर काढत असे हा पुष्कराज हा अमुक हा तमुक भाव ४००० रुप्यापासून सुरु होई आणि शेवटी चारशे ते पाचशे किंवा त्याहून कमी किमतीवर फिक्स होई , ते मोती खरे की खोटे हे मला माहीत नाही. पण इकडे आल्यावर जे बिझनेस अशा मोत्यांचा करतात त्यांच्या किंमतिंबघून आपण खरेच हबकतो, त्यांना काही वाटत नाही सरळ ते समोरचा घेणारा किती मालदार आहे किती त्रस्त आहे ह्यावर किमंत अवलंबून असते. मी एकाला म्हणालो अरे असा लोकांच्या मजबुरीचा फायदा उठवू नये, तो निर्लज्जपणे म्हणाला धंदा आहे अर्थात तो अमराठी होता, धंदा हेच आयुष्य होते त्याचे.अशा अनेक गोष्टी माणसाला आकर्षित करतात. कारण त्याला त्या नवीन असतात. तो विवंचनेत असतो.
तात्पर्य आपण आपल्याला स्वतःला का आणि कशाला हा प्रश्न विचारवयास हवा , तसे शिकले पाहिजे , स्वतःला स्वतःशी एकाग्र होता आले पाहिजे ?आपली गरज आणि क्षमता आपल्याला कळली पाहिजे , सतत शॉपिंग करणारे लोक मुले किंवा मुली मी कसा दिसतो आणि मी कशी दिसते अशा विचारात असतील , भ्रमात असतील तर एक वेळ अशी येते येणारे वार्धक्य त्यांना भयभीत करते. एक गोष्ट महत्वाची असते हे संपणारे आहे आताच तुमच्या मनाची मशागत तुम्ही स्वतः केली तर खूप काही चांगले घडेल नाहीतर मानसोपचार तज्ञ लोकांच्या अँपॉईंट्मेंट्साठी रांगेत उभे रहावे लागेल. ते देतील त्या गोळ्या खाव्या लागतील. तेव्हा स्वतःची नाळ म्हणजे हाव स्वतःच कापणे , सोडणे अत्यंत आवश्यक असते नाहीतर बाबा किंवा बुवा , मानसोपचारतज्ञ डॉक्टरांकडे खेटे घालावे लागतील.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply