आज मात्र माझी सटकली..
आमचे लग्न ठरत होते,
सांगून आली होती..
म्हटले आधी भेटावे आमचीच जातवाली
आमच्या घरी जातवालीच हवी ना..
मिळाली एकदा
फोनवरून बोलणे झाले होते ..
बरी वाटली भेटायचे ठरवले..
सर्व्हिस करत होती ,
बऱ्यापैकी पगार ..
तसा माझा बिझनेसही चांगला चालला होता…
बोलता बोलता म्हणाली..
तुम्ही एकत्र रहाता..
म्हणजे एकत्र रहाणार ..
हो कारण आई ,बाबा आणि मी ..
ती काहीच बोलली नाही..
मी विषय काढला तुझ्या घरात कोण ..
म्हणजे तुम्ही कुठे रहाता..
गोरेगावला ..
मोठ्या खोल्या आहेत..
सोसायटी आहे ..
नाही..पण जागा प्रशस्त आहे..
भाऊ आहे ..लग्न झाले नाही…
माझ्यानंतर होईल…
ठीक आहे मी म्हणालो..
तुम्ही जागा बुक का करून ठेवली नाही ..
ती म्हणाली…बरे असते..
माझ्या लक्षात आले..ठरवले
आज ह्या पोरीला पार फाट्यावर मारावयाचे
हे ‘ मॅरेज मटेरियल ‘ दिसत नाही.
मग तुझ्या भावाने ब्लॉक बुक केला असेल ना…
नाही..अजून ठरवले नाही..
म्हणजे नवरा बायको…पुढे मुले झाली तर…
त्याचा विचार त्या मूर्ख मुलीने केलेलाच नव्हता..
आता ती मुलगी मला जास्त कुरूप दिसू लागली होती..
तिलाही वाटले आपली इथे डाळ शिजणार नाही..
म्हणाली तसे नाही पण घेतलेली बरी ..
मी माझ्या आईबापांना सोडणार नाही..
बाकी सर्व काही करेन ..
कारण माझ्याशिवाय त्यांना कोणी नाही.
त्या मूर्ख मुलीला समजले हा काही
हातात येणार नाही..
मग इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु झाल्या..
निघावयाची वेळ झाली..
काही निष्पन्न झाले नाही…
तरीपण ती घुटमळत होती…
कारण ही तिची पहिली वेळ निश्चित नव्हती..
बाय केले ..
निघालो..
मागे वळून बघीतलेही नाही..
तिने बघीतले असेल नसेल काहीच कळले नाही..
दुसऱ्या दिवशी त्याच्या वडिलांचा फोन आला..
ते अक्षरशः रडले…
त्यांना म्हणालो तुमची मुलगी
कुठेच सुखी रहाणार नाही ..
मला बहुतेक अशाच मुली सांगून येत होत्या..
मी आणि माझा संसार..उच्चभ्रू जातवाली होऊ होती ना..
घ्या आता ..
त्यांना इतकी मिजास कसली..
खरे तर तिचे तिच्या आईबापांचे आयुष्य
चाळीत टमरेल घेऊन जाण्यात गेले.
जराही विचार करत नाही,
मग पकडतात कुठ्लारी मालदार तो पैसे देतो..
बाकी सुम बकरा निघतो..
मग आले परत कोर्ट कचेऱ्या..इगो ..लफडे बरेच काही.
आमचा तर ब्लॉक होता सर्व काही होते..
तसे माझेही वय निघून जात होते….
मग विचार आला अरे आमच्या उच्चभ्रू जातीतील
खरेच मध्यमवर्गीय मुलांचे काय होत असेल..
विशेषतः चाळीत राहणाऱ्या मुलांचे….
कल्पनाच करवत नाही…
मी तर ठरवले..
अशा इगोवाल्या
मुलींना भाव द्यायचा नाही…
असा विचार करत निघालो..
आणि मनात विचार आला..
आयला ती पण असाच विचार करत असेल का …?
हे न उलगडणारे त्रांगडे आहे हे निश्चित..
समोरच मार्केट होते..
रंगीबेरंगी ब्लॅंकेट्स , चादरी आणि गोधड्यांचे…
— सतीश चाफेकर
२७
Leave a Reply